सासरा कोण आणि जावई कोण? अनिल - आनंदच्या फोटोंवर चाहत्यांना प्रश्न

आनंद आणि अनिल कपूर यांचे हे फोटो इंग्लंडमधील आहेत

Updated: Mar 18, 2019, 03:49 PM IST
सासरा कोण आणि जावई कोण? अनिल - आनंदच्या फोटोंवर चाहत्यांना प्रश्न title=

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपू्र्वी 'मलंग'च्या टीममध्ये ६२ वर्षांचे अनिल कपूर सर्वात तरुण आणि उत्साहानं भरलेले दिसत होते. 'अनिल कपूर आजही एवढे चिरतरुण कसे?' हा प्रश्न त्यांच्या फॅन्सलाही पडला. आता अनिल कपूर यांनी स्वत: एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. त्यानंतर आता कदाचित त्यांच्या कुटुंबीयांनीही हाच प्रश्न विचारला असेल. 

अनिल कपूर यांनी शेअर केलेल्या फोटोत ते स्वत: स्टायलिश अंदाजात दिसत आहेत. त्यांच्या बाजुला आहे त्यांचा जावई अर्थात सोनम कपूर हिचा पती आनंद आहुजा... 

हाच फोटो आनंद आहुजानंही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केलाय. 

अनिल कपूर यांनी या फोटोला कॅप्शनही मोठी मजेशीर टाकलीय. 'बॉईज डे आऊट. स्वत:लाही मी एक तरुण मुलगा म्हणतोय'... त्यांचं हे कॅप्शन त्यांच्या फॅन्सलाही पटतंय.

या फोटोत अनिल कपूर यांच्या जावयाचे - आनंदची दाढी सफेद दिसतेय... पण अनिल कपूर मात्र एखाद्या तिशीच्या तरुणाप्रमाणेच दिसत आहेत. त्यामुळे मग प्रेक्षकही यावर आपलं निरीक्षण नोंदवत आहेत. दोघांपैंकी जावई कोण आहे? किंवा अनिल कपूर आनंदचे छोटे भाऊ दिसत आहेत, अशा आशयाच्या अनेक कमेंटस् या फोटोखाली दिसत आहेत. 

आनंद आणि अनिल कपूर यांचे हे फोटो इंग्लंडमधील आहेत. अनिल कपूर यांनी नुकताच आपल्या जावयासोबत काही वेळ व्यतीत केला. 

'सोशल मीडियावर ट्रोलिंगचे शिकार ठरणार' याची जाणीव असूनही केवळ या भीतीनं आनंदनं आपल्या 'एव्हरग्रीन' सासऱ्यांसोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करणं बंद केलेलं नाही. तो अनेकदा अनिल कपूर यांच्यासोबतचे फोटो शेअर करत असतो. या सासरा-जावयाचं मैत्रीचं नातंही चांगलंच जुळलेलं दिसतंय.