... म्हणून मलायकाने घातले अर्जूनचे कपडे

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर जेव्हाही बाहेर पडतात तेव्हा त्यांचे असे कपल गोल्स घेऊनच बाहेर पडतात. 

Updated: Jul 16, 2022, 04:33 PM IST
... म्हणून मलायकाने घातले अर्जूनचे कपडे title=

मुंबईः मलायला आणि अर्जून हे बॉलीवूडचे आघाडीचे कपल आहेत. त्यांच्या बाबतीत जे जे काही घडतं त्यात ते दोघंही फार खुश असतात आणि सर्व अपडेट्सही वेळोवेळी सोशल मीडियावरून देतच असतात. सध्या अर्जून आणि मलायका एकमेकांच्या प्रेमात लख्खं बुडाले आहेत. त्यातून आता त्या दोघांनाही ध्यास लागलाय तो एकमेकांसोबत वेळ घालवण्याचा. 

सोशल मीडियावर आपापले एकत्र फोटो टाकण्यापासून ते कुठल्याही शोला एकत्र फिरण्यापर्यंत दोघेही प्रेमी मस्त रॉमेंटिक फोटोशूटही करत आहेत. त्यातून सतत एकत्र राहिल्याने दोघेही कपल आता चाहत्यांच्या नजरेत आणखीनच पॉप्यूलर होत आहेत. 

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर जेव्हाही बाहेर पडतात तेव्हा त्यांचे असे कपल गोल्स घेऊनच बाहेर पडतात. तेव्हा अर्जून कपूर आणि मलायका अरोरा या पॉवर कपलने त्यांच्या चाहत्यांना इम्प्रेस करण्यासाठी परत एक नवीन फोटोशुट केले आहे. नुकतेच ते एका अवॉर्ड शोमध्ये सहभागी झाले होते. त्यात त्यांची फॅशन बघून सगळ्यांच्या नजरा त्यांच्याभोवती फिरल्या होत्या. त्यांच्या या नव्या लुकमुळे चाहते त्यांच्यावर भलतेच घायाळ झाले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मलायकाने ब्रँड राल्फ आणि रुसोचा शिमरचा ब्लू पॅंटसूट घातला होता आणि या पँटसूटवर तिने मस्त चमकणारे ब्लेझर घातले होते. मलायकाने स्टेटमेंट इयरिंग्ससोबत मेकअपसाठी तिने भरपूर मस्करा, ब्लू आयलाइनर, बीमिंग हायलाइटर, थोडासा ब्लश आणि न्यूड लिपस्टिक लावली होती. टू-पीस ब्लू सूटमधून पॅन्ट आणि सॅटिन शर्ट घालून अर्जून खूप हॅण्डसम दिसत होता. हा त्यांचा लुक जवळजवळ सारखाच होता तेव्हा त्यांचा लुक पाहून असे वाटले की मलायकाने अर्जूनचे कपडे घातले आहे कारण त्यांचे कपडे हे प्रचंड मॅचिंग होते.