मुंबई : सहसा मुलांना त्यांच्या पालकांनी जगातील सर्वोत्तम कपल व्हावं आणि कायम एकत्र राहावं असं वाटतं. मात्र, सैफ अली खान आणि अमृता सिंगची लाडकी सारा अली खानची विचारसरणी बाकीच्यांपेक्षा वेगळी आहे. तिचा असा विश्वास आहे की, तिच्या पालकांनी वेगळे होऊन चांगलं केलं.
आज सैफ अली खान आपला भूतकाळ विसरून स्वत:चं आयुष्य आनंदाने जगत आहे. हे सर्वांना माहीत आहे. पण, अमृता सिंगसोबत त्यांचं नाव वेळोवेळी चर्चेत असतं. त्याची मुलगी आणि अभिनेत्री सारा अली खाननेही या विषयावर आपलं मत मांडलं आहे. एका रिअॅलिटी शोदरम्यान साराने तिच्या आई-वडिलांच्या घटस्फोटाबद्दल सांगितलं होतं की, वेगळं झाल्यानंतर तिच्या आयुष्यात आनंद आला आणि ती मुक्तपणे जगू शकली.
सारा पुढे म्हणाली, 'मला वाटत नाही की ते दोघे कधी एकत्र आनंदी राहू शकतील. अशा परिस्थितीत त्यांचं वेगळं होणं हा त्यांच्यासाठी सर्वोत्तम निर्णय होता असं मला वाटतं. मी माझ्या आईला 10 वर्षात हसताना पाहिलं नव्हतं, अचानक ती आनंदी दिसू लागली. सारा पुढे म्हणली, ती अचानक आनंदी, उत्साही आणि सुंदर दिसू लागली.
माझे आईवडील वेगळ्या घरात राहून आनंदी आहेत हे पाहून मला वाईट का वाटेल? माझ्या पालकांसाठी वेगळं होणं कधीही कठीण नव्हतं. दोघंही आनंदी होते आणि त्यांच्या आनंदी सकारात्मक जागेत. मी आईला पाहत होते की, ती हसत होती आणि आनंदी होती. मी तिला असं कधीच पाहिलं नव्हतं. तिला आनंदी पाहणं हा माझ्यासाठी खूप छान अनुभव होता.
2004 मध्ये सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा घटस्फोट झाला तेव्हा सारा अली खान फक्त 9 वर्षांची होती. या निर्णयानंतर सैफने करीना कपूरसोबत लग्न केलं. त्याचवेळी अमृता सिंगने तिची दोन्ही मुले सारा अली खान आणि इब्राहिम अली खान यांना सिंगल मदर म्हणून वाढवलं.