मुंबई : अभिनेत्री-खासदार नुसरत जहाँचं वैवाहिक जीवन संकटात आलं आहे. यश दासगुप्ता सोबत वाढलेली जवळीक यामुळे नुसरत जहाँच्या विवाहित जीवनात अडचणी निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. दिर्घ काळ रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर नुसरत जाहाँ आणि पती निखिल जैन (Nikhil Jain)यांनी 2019 साली लग्न केलं. मात्र आता जहाँ यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे. सध्या नुसरत जाहाँ सहकलाकार अभिनेता यश दासगुप्ताला डेट करत असल्याचं देखील सांगण्यात येत आहे.
नुसरत आणि यश यांचं नात चर्चेत असताना, त्या दोघांचा मंदीरातील एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ डिसेंबर महिन्यातील असल्याचं सांगण्यात येत आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही एकत्र दिसत आहेत. सांगायचं झालं तर गेल्या दिवसांपासून नुसरत आणि यश यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले.
परंतू, नुसरत जाहाँ यांनी चर्चांना पूर्णविराम दिला आहे. नुसरत म्हणाल्या, 'माझ्या वैयक्तिक आयुष्यातील बाबी लोकांसाठी नाहीत. लोकांनी अशा परिस्थितीत नेहमी माझी परीक्षा घेतली आहे. पण आता मी भाष्य करणार नाही. जे काही आहे. चांगलं आहे, वाईट आहे.. ते फक्त माझं खासगी आयुष्य असल्याचं सांगतं त्यांनी या विषयाला पूर्णविराम दिला.
दरम्यान, २०१९ मध्ये टीएमसीकडून निवडणूक लढवून त्या खासदार झाल्या. बिझनसमन निखील जैन सोबत विवाह केल्यानंतर त्या चर्चेत देखील आल्या. विवाहानंतर तिचे अनेक फोटो समोर आले होते. ज्यामध्ये दोघेही हिंदू आणि मुस्लीम सण साजरा करताना दिसले. मात्र आता त्यांच्या वैवाहिक जीवनात संकट आलं आहे.