VIDEO : अय्यारीचा ट्रेलर, अँगरी लूकमध्ये मनोज वाजपेयी

लोकप्रिय फिल्ममेकर नीरज पांडे लवकरच "अय्यारी" हा सिनेमा प्रदर्शित करणार आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Dec 19, 2017, 05:36 PM IST
VIDEO : अय्यारीचा ट्रेलर, अँगरी लूकमध्ये मनोज वाजपेयी  title=

मुंबई : लोकप्रिय फिल्ममेकर नीरज पांडे लवकरच "अय्यारी" हा सिनेमा प्रदर्शित करणार आहे. 

अय्यारीचा अर्थ कोणत्याही परिस्थितीचा सामना करणं असा आहे. या सिनेमाचा स्टार कास्ट भरपूर इंटरेस्टिंग आणि वेगळा आहे.  या सिनेमात मनोज वाजपेयी सिद्धार्थ मल्होत्रा असे आपल्याला 
पाहायला मिळणार आहेत. 

मंगळवारी दुपारी 3 वाजता या सिनेमाचा ट्रेलर रिलिज झाला आहे. ट्रेलरमध्ये मनोज वायपेयी, अनुपम खेर आणि नसिरूद्दीन शाह हे सिरियल लूकमध्ये दिसत आहे. साऊथच्या अनेक सिनेमांत दिसलेली अभिनेत्री रकुल प्रीत सिंह देखील या सिनेमांत लीड रोलमध्ये आहे. दिग्दर्शक नीरज पांडे आपल्या प्रत्येक सिनेमात रिअल लाइफ लोकेशन्स चांगल्या पद्धतीने रंगवण्यात अतिशय लोकप्रिय आहेत. या सिनेमांत दिल्ली, कश्मीर आणि लंडन सारखे लोकेशन्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 

या सिनेमांतून सिद्धार्थ आणि मनोज वाजपेयी पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर एकत्र आहेत. महत्वाची बाब म्हणजे बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची टक्कर ही अक्षय कुमारच्या "पॅडमॅन" सोबत असणार आहे. 

हा सिनेमा 26 जानेवारी 2018 रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची स्टोरी दोन अशा आर्मी ऑफिसर्सची आहे जे आपल्या पद्धतीने काम करतात. त्यांचे विचार एकमेकांशी अजिबात जुळत नाहीत. पण तरी देखील त्यातील एक गुरू आणि तर दुसरा चेला. ही सत्य घटनेवर आधारित सिनेमा आहे.