...पुरुषाची गरज नाही, म्हणत अभिनेत्रीचा स्वत:शीच विवाह; पाहा पहिले Photo

आता पुन्हा एका तरुणीने स्वत:शी लग्न केलं आहे. ही तरुणी दुसरी तिसरी कोणी नसून एक अभिनेत्री आहे.

Updated: Aug 17, 2022, 01:25 PM IST
...पुरुषाची गरज नाही, म्हणत अभिनेत्रीचा स्वत:शीच विवाह; पाहा पहिले Photo title=
trending news tv actress kanishka soni marries herself and said i dont need a man in marathi

TV Actress Marries Herself : काही महिन्यांपूर्वी गुजरातमधील एका मुलीने स्वत:शी लग्न केलं होतं. या घटनेनंतर भारतात सगळीकडे खूप आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं. एक मुलगी स्वत:शीच कसं लग्न (Marries Herself) करु शकते, असं करण्यामागे कारण काय असे अनेक प्रश्न समोर आलीत. आता पुन्हा एका तरुणीने स्वत:शी लग्न केलं आहे. ही तरुणी दुसरी तिसरी कोणी नसून एक अभिनेत्री आहे.

सोशल मीडियावर तिने टाकलेल्या फोटो आणि कॅप्शनमुळे ही चर्चा रंगली आहे. 'दिया और बाती हम', 'पवित्र रिश्ता' आणि 'देवी आदि पराशक्ती' सारख्या अनेक हिट मालिकांमधील ही अभिनेत्री आहे. आलं का तुमच्या लक्षात, अभिनेत्री कनिष्का सोनी (Kanishka Soni) हिने स्वत:शी लग्न करुन चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.  

''...पुरुषाची गरज नाही,''

फेसबुक आणि इंस्टाग्रामवर कनिष्काने संदूर आणि मंगळसूत्र घातलेला फोटो शेअर केला आणि चाहत्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. या फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (trending news tv actress kanishka soni marries herself and said i dont need a man in marathi)

ती म्हणते की, ''मी स्वतःशी लग्न केले आहे. मी स्वतः माझी सर्व स्वप्ने पूर्ण केली आहेत आणि मी एकमेव व्यक्ती आहे जिच्यावर मी प्रेम करते. सर्व प्रश्नांचे उत्तर असे आहे की, मला कुठल्याही पुरुषाची गरज नाही...मी एकटी आणि एकांतात माझ्या गिटारसह नेहमी आनंदी असते... मी एक देवी आहे, बलवान आणि शक्तीशाली आहे, शिव आणि शक्ती सर्व काही आहे. धन्यवाद...''

फेसबुक हॅक

कनिष्काच्या या पोस्टवर काहींनी तिचं अभिनंदन केले तर काहींनी तिला ट्रोलही केलं. पण कनिष्काने त्यानंतर अजून एक पोस्ट टाकली. ज्यात ती म्हणाली की, ''माझं फेसबुक हॅक झालं आहे.कदाचित हॅकर माझ्या लग्नाच्या पोस्टमुळे नाराज झाला असणार.''

खरंतर तिने कुठल्याही रितीरिवाजनुसार लग्न केलेलं नाही. तर सोशल मीडियावर कनिष्काने एकटं राहण्याची इच्छा बोलवून दाखवली आहे.