मुंबई : बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदूकोनचा युएईमध्ये ग्लोबल आयकॉन ऑफ द ईयर या पुरस्कारानं सन्मान करण्यात आलाय. पण दुर्देवाने तिचा हा आनंद फार काळ टीकू शकला नाही. कारण श्रीलंकेत केलेल्या एका बोल्ड फोटोशूटमुळे दीपिकाला सोशल मीडियावर चांगलचं ट्रोल केलं जातयं.
एकीकडे भारतात दीपिकाच्या पद्मावतीवरुन वाद सुरुये..दीपिकाला ट्रोल केल जातयं. तर दुसरीकडे युएईमध्ये दीपिकाला तिच्या कामाची पोचपावती मिळालीये. नुकतचं य़ुएईमध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान दीपिकाला ग्लोबल ऑयकॉन ऑफ द ईयर म्हणून गौरवण्यात आलयं..या इव्हेंटला दीपिकाने अबु जानी, संदीप खोसलाने डिझाईन केलेला ड्रेस परिधान केला होता. दीपिकाने युएईमधील फॅन्सना त्यांनी दिलेल्या प्रेमाद्दल थॅंक्यू म्हंटलंय.
पण दीपिकाचा हा आनंद काळ टिकला नाही. कारण दीपिका भारतात परतताचं तिने श्रीलंकेत शूट केलेल्या एका बोल्ड फोटोशूटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलं झाला. या फोटोशूटमध्ये दीपिकाचा ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाचं आवडलाये..पण काही ट्रोलर्सने दीपिकाला चांगलचं ट्रोल केलं. अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन ट्रोलर्सने दीपिकाला फैलावर घेतलं.
दीपिकाने काहीही केलं तरी पद्मावतीवरुन तिला ट्रोल केलचं जातयं. पण दीपिकाला या सगळ्या गोष्टीचा काही फरक पडल्याचे वाटत नाहीये. दीपिकाला ग्लोबल ऑफ द ईयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलयं..त्यावर तर कोणी काही बोलतं नाही..पण दीपिकाला नको त्या गोष्टीवरुन ट्रोल करणं कितपत योग्य आहे, असा सवाल विचारण्यात येत आहे.