तुला पाहते रे : कोण आहे जयदीप सरंजामे?

कोण आहे हा अभिनेता? 

तुला पाहते रे : कोण आहे जयदीप सरंजामे?

मुंबई : झी मराठीवरील 'तुला पाहते रे' ही मालिका दिवसेंदिवस अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. या मालिकेतील सर्व पात्र आता लोकांच्या पसंतीला पडत आहेत. त्यातीलच एक पात्र म्हणजे जयदीप सरंजामे. जयदीप हा मुख्य कॅरेक्टर विक्रम सरंजामेचा लहान भाऊ आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच मन जिंकल आणि टीआरपीच्या यादीत या मालिकेची नोंद झाली. आता यातील अनेक पात्रं ही नवीन आहेत किंवा त्यांची महत्वाची ओळख आपल्याला माहित नाही. 

त्यातील एक व्यक्ती म्हणजे जयदीप सरंजामे.  ही भूमिका साकारली आहे ‘आशुतोष गोखले’ या अभिनेत्याने. आशुतोष गोखले यांचा जन्म २७ मे १९९१ साली मुंबई येथे झाला. रुपारेल कॉलेजमधून त्याने आपले शिक्षण घेतले आहे. त्यावेळी अनेक एकांकिकामध्ये त्याने उत्स्फूर्त सहभाग दर्शवला होता. संगीत कोणे एके काळी, बत्ताशी, सवाई यासारख्या एकांकिकेचे सादरीकरण केले. त्यापैकी बत्ताशी या एकांकिकेला उत्कृष्ट एकांकिकेचे पारितोषिकही मिळाले.

भाऊचा धक्का, युनो यासारख्या शॉर्ट फिल्मचाही तो एक भाग बनला. ओ वुमनिया, डोन्ट वरी बी हॅपी आणि भारत जाधवसोबत मोरूची मावशी ही नाटकेही त्याने रंगमंचावर गाजवली. अगदी सहज साधा अभिनय म्हणून त्याची ख्याती आहे. रक्तातच अभिनय असल्याचं बरेच जण सांगतात. रंगमंच असो व एखादी मालिका सगळ्यांत अगदी सहजपणे रुळणारे आशुतोष गोखले सर्वानाच हवेहवेसे वाटतात. मनमिळाऊ आणि खोडकर स्वभाव हि त्यांची जमेची बाजूच म्हणावी लागेल. 

आशुतोष गोखले हा प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक “विजय गोखले” यांचा मुलगा आहे. विजय गोखले यांनी दूरदर्शनवरील ” श्रीमान श्रीमती ” ही हिंदी विनोदी मालिका गाजवली होती. या मालिकेतील भूमिकेमुळे ते घराघरात जाऊन पोहोचले. सालीने केला घोटाळा, ही पोरगी कोणाची, पोलिसाची बायको यासारख्या अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. दम असेल तर, भरत आला परत यांचेअभिनेता आणि दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. ‘दम असेल तर’ मध्ये त्यांनी त्यांचा मुलगा आशुतोष याला देखील अभिनयाची संधी दिली होती. आशुतोषची आई सविता गोखले आणि बहीण श्रद्धा गोखले दोघीही डेंटिस्ट असून आपापल्या क्षेत्रात कार्यरत आहेत.