टीआरपीमध्ये राणादा-अंजलीची जोडी अव्वल

झी मराठी वाहिनीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत राणादा आणि अंजली बाई यांच्यातील प्रेमकहाणी चांगलीच रंगत चाललीये. त्यांच्या फुलत चाललेली प्रेमकहाणी यामुळे या मालिकेला प्रतिसादही चांगलाच मिळतोय.

Updated: Jul 13, 2017, 06:57 PM IST
टीआरपीमध्ये राणादा-अंजलीची जोडी अव्वल

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत राणादा आणि अंजली बाई यांच्यातील प्रेमकहाणी चांगलीच रंगत चाललीये. त्यांच्या फुलत चाललेली प्रेमकहाणी यामुळे या मालिकेला प्रतिसादही चांगलाच मिळतोय.

टीआरपीमध्ये सध्या राणादा-अंजली ही जोडी अव्वल बनलीये. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने टीआरपीत अव्वल स्थान मिळवलेय. तर दुसऱ्या स्थानावर 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका आहे. 

भारत दौऱ्यावर असलेली निलेश आणि टीम तिसऱ्या स्थानी आहेत. तर शिव-गौरीची कथा असलेल्या 'काहे दिया परदेस' चौथ्या क्रमांकावर आहे. 'लागिर झालं जी' या मालिकेनंही टॉप ५ मध्ये स्थान मिळवले असून ते पाचव्या स्थानी आहेत.