यापुढेही कुस्ती खेळत राहणार - राणादा

सध्या कोल्हापुरात एकच चर्चा आहे ती म्हणजे राणादा वज्रकेसरी जिंकल्याची. अपघातातून थोडक्यात सावरलेल्या राणादाने मोठ्या हिंमतीने वज्रकेसरी स्पर्धेत भाग घेतला आणि ती स्पर्धा जिंकलीही.

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Nov 30, 2017, 08:17 PM IST
यापुढेही कुस्ती खेळत राहणार - राणादा title=

मुंबई : सध्या कोल्हापुरात एकच चर्चा आहे ती म्हणजे राणादा वज्रकेसरी जिंकल्याची. अपघातातून थोडक्यात सावरलेल्या राणादाने मोठ्या हिंमतीने वज्रकेसरी स्पर्धेत भाग घेतला आणि ती स्पर्धा जिंकलीही.

वज्रकेसरी जिंकल्यानंतर राणादावर कौतुकाचा वर्षाव होतोय. एरव्ही लाजरा बुजरा, माणसांच्या घोळक्यात कमी वावरणाऱ्या राणादाची लाईव्ह पत्रकार परिषद पार पडली. यावेळी सुरुवातीला पत्रकार परिषदेत राणादा संकोचल्यासारखा होता. मात्र पाठकबाईंनी धीर देताच पत्रकारांच्या प्रश्नांना त्याने धडाडीने उत्तरे दिली. 

पाठकबाईंनी दिलेल्या पाठिब्यांमुळेच वज्रकेसरी जिंकू शकलो असे राणादा यावेळी म्हणाला. त्याने या विजयाचे श्रेय पाठकबाईंना दिलेय. तसेच यापुढेही कुस्ती खेळत राहणार. त्यासोबत आणखी कुस्तीपटू घडवण्यासाठी प्रयत्न करत राहणार असल्याचे राणादाने पत्रकार परिषदेत सांगितले.