close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अक्षयला कंटाळलेल्या ट्विंकलने केली तक्रार...

काय आहे हा अजब प्रकार 

अक्षयला कंटाळलेल्या ट्विंकलने केली तक्रार...

मुंबई : अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना बॉलिवूडमध्ये आयडिअल कपल म्हणून ओळखले जातात. मात्र आता या बी टाऊनच्या आयडिअल कपलमध्ये काही वाद होत आहेत. आणि याची कबुली स्वतः ट्विंकल खन्नाने दिली आहे. ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारवर नाराज असल्याचं सांगितलं आहे. ट्विंकल खन्नाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अक्षय कुमारचा फोटो शेअर केला आहे. आणि ती म्हणते, काश तो मला पण असा बघत असता जसं त्याने आपल्या ग्रीनी टी Creme Brulee कडे पाहिलं आहे. एक छोटं रेस्टॉरंट आहे जिकडे जेवण खूप स्वादिष्ट आहे. 

शेअर केलेल्या या फोटोत ट्विंकल खन्ना नाराज असल्याचं दिसत आहे. अक्षय आपल्या ग्रीन टीकडे अगदी प्रेमाने पाहत आहे. ट्विंकल खन्नाने आपल्या नवऱ्यासोबत म्हणजे अक्षयसोबत क्वालिटी टाइम स्पेंड केला आहे. आता ती रोमानियाच्या एका छोट्या शहरात टीटूमध्ये आहे. अक्षय कुमार लवकरच आपला 'गोल्ड' हा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात अक्षयच्या अपोझिट मौनी रॉय आहे. हा सिनेमा हॉकी प्लेअर दलबीर सिंह यांच्यावर आधारित आहे.