यूपीच्या कॉलेजमध्ये बिग बींनी दिली बीएडची परिक्षा?

काय आहे हे प्रकरण?

यूपीच्या कॉलेजमध्ये बिग बींनी दिली बीएडची परिक्षा?

 मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गोण्डाच्या एका महाविद्यालयात बीएडची परिक्षा देणार आहेत. ही बातमी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हे प्रकरण तेव्हा समोर आले जेव्हा अमिताभ बच्चन यांचा फोटो एडमिट कार्ड युनिर्व्हसिटीमध्ये जाहीर करण्यात आलं. या बातमीमागील सत्य अखेर समोर आलं आहे. यूपीच्या डॉक्टर राम मनोहर लोहिया महाविद्यालयात अमित द्विवेदी नावाच्या विद्यार्थ्याच्या कार्डवर अमिताभ बच्चन यांचा फोटो लावून देण्यात आलं. अमित द्विवेदी बीएड करत असून त्याच्या प्रवेश पत्रावर बिग बींचा फोटो लावण्यात आला. यामुळे त्याला परिक्षा केंद्रात प्रवेश नाकारला. नंतर भरपूर वाद घातल्यानंतर प्रवेश मिळाला.

एडमिटा कार्डवर कुणा सेलिब्रिटीचा फोटो लागणं ही काही पहिली गोष्ट नाही. या अगोदर आग्राच्या युनिर्व्हसिटीमध्ये एका आर्ट स्टुडंटच्या मार्कशीटवर सलमान खानचा फोटो लावण्यात आला होता. त्या विद्यार्थ्याने 35 टक्के मिळवले होते.