नोरा फतेहीला टक्कर देतेय उर्फी जावेद? पाहा डान्सचा जलवा

नोरा फतेहीची चर्चा सोशल मीडियावर चर्चेत 

Updated: Oct 18, 2021, 12:28 PM IST
नोरा फतेहीला टक्कर देतेय उर्फी जावेद? पाहा डान्सचा जलवा

मुंबई : बिग बॉस फेम अभिनेत्री उर्फी जावेदचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, अभिनेत्री तिच्या टोन्ड फिगरला फ्लॉन्ट करताना डान्स फ्लोअरवर धुमाकूळ घालत आहे. उर्फी जावेद प्रोफेशनल डान्सर सारखी परफॉर्म करत आहे.  तिचा हा व्हिडिओ चाहत्यांना आवडत आहे.

व्हायरल होतोय फोटो 

अभिनेत्री तिच्या बोल्ड लूक आणि बिकीनीमुळे चर्चेत आहे. अलीकडेच, ऑफ शोल्डर ड्रेसमधील तिचे फोटो प्रचंड व्हायरल झाले. विमानतळावर अनेकदा अभिनेत्री अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये दिसते. तिने प्लास्टिकच्या पिशव्यांनी बनवलेली बिकिनी आणि मोजे बनवून लोकांचे लक्ष वेधून घेतले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अतरंगी ड्रेसमध्ये दिसते उर्फी 

वर्क फ्रंटबद्दल बोलताना, उर्फी जावेद यापूर्वी रिऍलिटी टीव्ही शो 'बिग बॉस ओटीटी'मध्ये दिसली होती. या शो मध्ये तिचे पदार्पण खूप चांगले होते पण ती या शो मध्ये जास्त काळ टिकू शकली नाही. ती खूप कमी वेळात यातून बाहेर पडली. तेव्हापासून ती विमानतळावर विचित्र पद्धतीने दिसू लागली.

पापाराजी पेजवर कायम चर्चेत 

अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि दररोज तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत राहते. उर्फी जावेद काही मोजक्या अभिनेत्रींपैकी एक आहे. उर्फीला पाहून तिच्याभोवती पापाराझींची गर्दी कायमच असते. पण बिग बॉस मधून बाहेर आल्यापासून उर्फीची जोरदार चर्चा रंगली आहे.