व्हायरल व्हिडिओबद्दल उर्वशी रौतेलाने दिलं स्पष्टीकरण, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

उर्वशी रौतेला ही बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे जी अनेकदा तिच्या ग्लॅमरच्या जोरावर प्रसिद्धीच्या झोतात येते.उर्वशी रौतेला नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या उर्वशी रौतेला तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेचा विषय बनली आहे.

Updated: Mar 22, 2023, 10:53 PM IST
व्हायरल व्हिडिओबद्दल उर्वशी रौतेलाने दिलं स्पष्टीकरण, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

Urvashi Rautela I Love You Video : उर्वशी रौतेला सध्या चित्रपट जगतापासून दूर ऑस्ट्रेलियामध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. क्रिकेटची आवड असलेली उर्वशी टी-20 वर्ल्ड कप 2022 दरम्यान टीम इंडियाला चीअर करण्यासाठी येथे आली होती. त्याचबरोबर अभिनेत्री तिच्या पुढच्या एका प्रोजेक्टच्या शूटिंगच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियात उपस्थित असल्याचा दावा अनेक बातम्यांमध्ये केला जात आहे.

अभिनेत्री उर्वशी रौतेलाला बॉलीवूडच्या सुप्रसिद्ध आणि सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक म्हटलं जातं, ती सध्या तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत आहे. तसं, अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील चर्चेत आहे. तिचं नाव अनेकदा ऋषभ पंतसोबत जोडलं जातं.

उर्वशी रौतेला नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या उर्वशी रौतेला तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेचा विषय बनली आहे. दरम्यान, उर्वशीने तिच्या एका व्हायरल व्हिडिओबाबत मौन सोडलं आहे. उर्वशी रौतेलाने आय लव्ह यू व्हिडिओबद्दल खुलासा केला आहे की, या व्हिडिओमध्ये ती कोणाला आय लव्ह यू म्हणत आहे आणि तिने हे का केलं. याबद्दल तिने स्पष्टीकरण दिलं आहे

''आजकाल सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या माझ्या आय लव्ह यू व्हिडिओबद्दल मला सांगायचं आहे की, हा व्हिडिओ केवळ अभिनयाच्या उद्देशाने होता,  हा व्हिडिओ कोणत्याही विशिष्ट व्यक्तीसाठी नव्हता किंवा तो कोणत्याही प्रकारच्या व्हिडिओ कॉलचा भाग नव्हता.'' असं तिने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. ऋषभ पंतसोबतच्या व्हिडीओ कॉलमुळे उर्वशी रौतेलाचा हा आय लव्ह व्हिडीओ व्हायरल झाला होता. जरी तो फक्त एक फेक व्हिडिओ होता.

उर्वशी रौतेला ही बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे जी अनेकदा तिच्या ग्लॅमरच्या जोरावर प्रसिद्धीच्या झोतात येते. पण गेल्या अनेक दिवसांपासून उर्वशी रौतेलाच्या अशा सोशल मीडिया पोस्ट्स समोर आल्या होत्या, ज्यावरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की, कोणीतरी अभिनेत्रीचा हार्टब्रेक केला होता. आता नुकतच उर्वशी रौतेलाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. उर्वशी रौतेलाची ही पोस्ट तिच्या व्हायरल व्हिडिओबद्दल आहे, ज्यामध्ये ती आय लव्ह यू म्हणताना दिसत आहे.