या अभिनेत्रीला ओल्या मातीने अंघोळीची आवड, शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल

जाणून घ्या ओल्या मातीने आंघोळ केल्याचे फायदे...

Updated: Jun 14, 2021, 09:31 PM IST
या अभिनेत्रीला ओल्या मातीने अंघोळीची आवड, शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती सतत तिचे बोल्ड आणि हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. उर्वशीने सोशल मीडिया एक फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे चाहते चकित झाले आहेत. तिने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये तिच्या आवडीबद्दल देखील सांगितलं आहे. 

उर्वशीने नुकताचं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने पूर्ण शरीराला ओली माती लावली आहे. शरीराला माती लावण्याचं कारण तिने चाहत्यांना कॅप्शनच्या माध्यमातून सांगितलं आहे. उर्वशीचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोशल मीडिया फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये, 'माझा आवडता मड बाथ/ मड थेरपी... Balearic बीचवर रेड मड एन्जॉय करत आहे. असं म्हटलं जातं की व्हीनस, प्रेमाची रोमन देवी, याचा आरसा म्हणून वापरत असे. मिनरल युक्‍त ही ओले माती त्वचेसाठी चांगली मानली जाते. '

पुढे उर्वशी म्हणते, 'मड थेरपीमुळे त्वचा मुलायम होते. मड थेरपी अशुद्धी दूर करते.'