मुंबई : आपल्या हॉट फोटोमुळे नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या अभिनयाचे धडे घेत आहे. लॉकडाऊनमध्ये शुटींग बंद असल्याने सेलिब्रिटी वेगवेगळ्या कामात व्यस्त आहेत. कोणी डान्स शिकतंय, कोणी फिटनेसकडे लक्ष देतंय तर कोणी अभिनयाचे धडे घेतंय. उर्वशी सध्या कोणाकडून अभिनयाचे धडे घेतेय हे तिने शेअर केलं आहे.
"कोविड - १९ ने मला स्वतःबद्दल अधिक जाणून घेण्यास शिकविले आहे आणि आता मी नेटली पोर्टमॅनकडून ऑनलाईन मास्टर क्लास घेत आहे, ती ऑस्कर विजेती अभिनेत्री आहे आणि तिने माझे आवडते चित्रपट ब्लेक स्वान आणि जॅकी मध्ये काम केले आहे", असे उर्वशी म्हणाली.
उर्वशीने पुढे म्हटलं की, "पहिल्यांदाच मी ऑनलाईन क्लास घेत आहे. या दरम्यान तिने आपल्या २५ वर्षाच्या करीअरचे अनुभव आमच्या सोबत शेअर केले".
ग्रेट ग्रँड मस्ती" आणि "पागलपंती" सारख्या चित्रपटांमध्ये काम करणारी उर्वशी रौतेला म्हणते की, अभिनय हा माझ्यासाठी खूप आनंददायक अनुभव आहे आणि मला वाटते की त्य़ांसाठी नेटली ही सर्वात चांगली निवड आहे.'