शिल्पा शेट्टीने राज कुंद्राच्या तोंडावर फेकून मारली चप्पल! पॉर्नोग्राफी प्रकरणानंतर तो...

UT 69 Trailer Shilpa Shetty Throw Chappal On Raj Kundra: राज कुंद्राने अभिनय केलेला 'यूटी 69' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मुंबईमध्ये प्रदर्शित झाला. याचवेळी बोलताना राजने हा घटनाक्रम सांगितला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 19, 2023, 10:10 AM IST
शिल्पा शेट्टीने राज कुंद्राच्या तोंडावर फेकून मारली चप्पल! पॉर्नोग्राफी प्रकरणानंतर तो... title=
राज कुंद्रा यांनीच या प्रकरणावर भाष्य केली आहे

UT 69 Trailer Shilpa Shetty Throw Chappal On Raj Kundra: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राने आता अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. राज कुंद्राने त्याच्यावर आलेल्या संकटामधून मार्ग शोधण्यासंदर्भातील म्हणजेच तुरुंगात जाण्याची वेळ आली या अनुभवांबद्दल अन् घडामोडींबद्दल भाष्य करणारा एक चित्रपट निर्माण केला आहे. राज कुंद्राला 2021 मध्ये पॉर्नोग्राफिक प्रकरणामध्ये अडकल्यानंतर ऑर्थर रोड तुरुंगामध्ये काही दिवस मुक्काम करावा लागला होता. 

'यूटी 69' चित्रपट येतोय...

राज कुंद्राविरोधातील हा खटला, त्यानंतर तुरुंगातील मुक्काम या सर्व घडामोडींवर भाष्य करणार 'यूटी 69' नावाचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट राज कुंद्राचा बायोपीक असल्याचीही चित्रपट वर्तुळात चर्चा आहे. पॉर्नोग्राफीसंदर्भातील या प्रकरणामध्ये तुरुंगात केल्यानंतर आणि तिथून बाहेर आल्यानंतरही अभिनेत्री शिल्पा शेट्टी राज कुंद्राच्या पाठीशी उभी होती. मात्र या दोघांनी कधीच उघडपणे याबद्दल भाष्य केलं नाही. राज कुंद्राच्या या आगामी चित्रपटाचं ट्रेलर लॉन्चिंग बुधवारी मुंबईत पार पडलं. या प्रसंगी प्रसारमाध्यमांच्या अनेक प्रश्नांना राज कुंद्रांनी उत्तरं दिली.

शिल्पाची चप्पल माझ्या तोंडावर पडली

राज कुंद्राला पहिल्यांदा या चित्रपटाबद्दल पत्नी शिल्पा शेट्टीला सांगितलं तेव्हा काय प्रतिक्रिया होती असा प्रश्न विचारण्यात आला. तुमच्या आयुष्यातील या धक्कादायक घडामोडींवर चित्रपट बनवण्याच्या कल्पनेवर तुमच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया काय होती, असं राज कुंद्राला विचारण्यात आलं. राज कुंद्राने या प्रश्नाला उत्तर देताना, "मी जेव्हा तिला हे सांगितलं तेव्हा ती माझ्यापासून बऱ्याच अंतरावर उभी होती. मी पहिल्यांदाच याबद्दल तिला विचारत होतो त्यामुळे मी तिच्याकडे पाठ करुन हे बोललो आणि तिच्या फार जवळ जाण्याच्या विचारातही नव्हतो. माझ्याकडे एक स्क्रीप्ट आहे असं मी तिला सांगितलं अन् तिच्या प्रतिसादाची वाट पाहू लागलो. मी जसं तिच्याकडे तोंड फिरवलं तशी एक चप्पल माझ्या तोंडावर पडली. तेव्हा मला वाटलं की हा चित्रपट निर्माण करता येणार नाही. तेव्हा मी माझ्या दिग्दर्शकाला बोलावलं आणि त्यानेच शिल्पाला या चित्रपटासंदर्भात समजावलं. कारण मला ते तिला समजावता येत नव्हतं," असं सांगितलं.

हा अभिनयन करणार का? शिल्पाचा प्रश्न

"माझ्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने तिला समजावलं की चित्रपट कसा तयार केला जाईल. तिला थोडक्यात स्टोरी सांगण्यात आली. त्यावेळेस हा चित्रपट सध्याच्या प्रस्थापित पद्धतीला विरोध करणारा नसल्याचं समजलं. हा चित्रपट या प्रकरणासंदर्भातही नसल्याचं तिला कळलं. ही एका व्यक्तीची गोष्ट आहे असं तिला समजल्यानंतर तिने मला पाठिंबा दिला. शिल्पाने माझ्याकडे पाहून दिग्दर्शकाला, हा अभिनय करेल का? असा प्रश्न विचारला. त्यावर मीच उत्तर देताना, "होय, मी मेथड अॅक्टींग करायला आलो आहे. मी तुरुंगात सर्व काही शिकलो आहे. मी करेन अभिनय," असं म्हटलं. तिला चित्रपटाची कल्पना आवडली. तिने मला प्रत्येक गोष्टीत पाठिंबा दिला. मी जे काही केलं ती कायम माझ्या पाठिशी उभी राहिली," असं राज कुंद्राने पत्नी शिल्पाकडून मिळत असलेल्या पाठिंब्याबद्दल भाष्य करताना म्हटलं.

हाच माझ्यासाठी विजय आहे

शिल्पाने माझा हा चित्रपट पाहिला आहे आणि तिला हा चित्रपट फारच आवडला आहे. राज कुंद्राने, "चित्रपट पाहिल्यानंतर तिला माझा अभिमान वाटत आहे हाच माझ्यासाठी विजय आहे," असंही म्हटलं. राज कुंद्राचा हा चित्रपट 3 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.