वरूण - जान्हवी चाहत्यांसोबत रमले खेळात

 'या' उपक्रमामुळे तुम्ही सुद्धा भेटू शकता तुमच्या आवडत्या कलाकाराला  

Updated: Oct 23, 2019, 12:22 PM IST
वरूण - जान्हवी चाहत्यांसोबत रमले खेळात

मुंबई : अभिनेता वरूण धवण आणि अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या आपापल्या आगामी चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत ते मैदानी खेळ खेळताना दिसत आहेत. वरून आणि जान्हवी त्यांच्या चाहत्यांसोबत चित्रपटाच्या सेटवर नाही तर चक्क मैदानात घाम गाळताना दिसत आहे. ते पेंटबॉल या खेळात रमले आहेत. 

परंतु , त्यांच्या या खेळामागे एक प्रमुख हेतू आहे. बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर सध्या समाजकार्यामध्ये व्यस्त आहे. 'फॅनकाइन्ड' या उपक्रमाच्या माध्यमातून ती गरजूंसाठी निधी जमा करण्याचं काम करणार आहे. 

हा नवीन उपक्रम चाहत्यांना सेलेब्ससोबत जोडणार आहे. याच उपक्रमाच्या माध्यमातून वरून आणि जान्हवीच्या चाहत्यांना त्यांना भेटता आलं आहे. वरूण-जान्हवीचा चाहत्यांचा एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. 

वरूण धवन सध्या त्याच्या 'कुली नं १' चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात अभिनेत्री सारा अली खान आणि वरूण एकत्र झळकणार आहेत. तर जान्हवी सध्या 'रूही अफ्जा' आणि 'गुंजन सक्सेना' चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे.