close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

प्रदर्शनाआधीच 'कलंक'ची हवा, सव्वा महिने अगोदरच प्री-बुकिंग सुरू

हा सिनेमा आपल्या ओपनिंगपासूनच अनेक रेकॉर्ड सेट करण्यासाठी यशस्वी ठरेल, अशी आशा ट्रेड पंडितांनी व्यक्त केलीय

Updated: Mar 14, 2019, 04:56 PM IST
प्रदर्शनाआधीच 'कलंक'ची हवा, सव्वा महिने अगोदरच प्री-बुकिंग सुरू

मुंबई : मल्टिस्टारर 'कलंक' या चित्रपटाचा टीझर समोर आला आणि बॉलिवूड चाहत्यांमध्ये आपली हवा पसरवण्यासाठी यशस्वीही ठरला. भव्यदिव्य सेटस् आणि सिनेमाचं बजेट यासाठी हा सिनेमा अगोदरपासूनच चर्चेत आहे. परंतु, या सिनेमाच्या टीझरनं प्रेक्षकांनाही वेड लावलं. प्रेक्षकांत पसरलेली ही हवा 'एन्कॅश' करायचं निर्मात्यांनी ठरवलेलं दिसतंय. याचाच एक भाग म्हणून सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीच या सिनेमाचं प्री-बुकिंग सुरू करण्यात आलंय. हा सिनेमा प्रदर्शित व्हायला अजून सव्वा महिना बाकी आहे. 

हा सिनेमा आपल्या ओपनिंगपासूनच अनेक रेकॉर्ड सेट करण्यासाठी यशस्वी ठरेल, अशी आशा ट्रेड पंडितांनी व्यक्त केलीय. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हा सिनेमा पहिल्याच दिवशी १८ ते २० करोड रुपयांच्या कमाईसह बॉक्स ऑफिसवर ओपनिंग करु शकतो. 

 

करण जोहरसोबत 'स्टुडंटस्' म्हणून पदार्पण केलेल्या वरुण आणि आलियाच्या करिअरमधला हा 'माइलस्टोन' ठरू शकतो. आज या सिनेमाचा आणखीन एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आललंय. या पोस्टरमध्ये 'जफर' अर्थात वरुण धवन एका रानबैलासोबत झुंज देताना दिसतोय. 

हा सिनेमा १७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. परंतु, या सिनेमाचं बुकिंग आत्तापासूनच सुरू झालंय. 

या सिनेमाचं दिग्दर्शन 'टू स्टेटस्'फेम अभिषेक वर्मन यांनी केलंय. तसंच अभिषेकनं 'जोधा अकबर', 'स्टुडंटस् ऑफ द इअर' यासारख्या सिनेमांत सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केलंय. तर या सिनेमाची निर्मिती करण जोहर आणि साजिद नाडियादवाला करत आहेत. या सिनेमात वरुण सोबत आदित्य रॉय कपूर, संजय दत्त, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, माधुरी दीक्षित यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.