अभिनेता वरुण धवन या तरुणीसोबत करणार लग्न?

बॉलिवूडचा अभिनेता वरुण धवन लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 21, 2018, 01:24 PM IST
अभिनेता वरुण धवन या तरुणीसोबत करणार लग्न?

मुंबई : बॉलिवूडचा अभिनेता वरुण धवन लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

वरुण अडकणार विवाहबंधनात

भारतातील मोस्ट एलीजिबल बॅचलरच्या यादीत वरुण धवनचा नंबर लागतो. त्याच्या अनेक चाहत्या तरुणी आहेत. पण लाखो चाहत्यांना तो लवकरच लग्नाची बातमी देणार आहे. वरुण धवन त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल सोबत विवाह करणार आहे.

अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये

नताशा आणि वरुण हे अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. नताशा दलाल वरुण आणि त्याची को-स्टार यांच्यापासून सुरक्षित राहू इच्छिते. म्हणून ती लवकरात लवकर विवाह करु इच्छिते आहे. नताशाचे कुटुंबिय देखील या विवाहासाठी तयार आहेत.

Image result for varun dhavan natasha zee

आधीही होत्या चर्चा

काही दिवसांपूर्वी वरुणने त्याच्या आई-वडिलांचं घर सोडून नवं घर घेतलं तेव्हा असं बोललं जात होतं की, तो लवकरच नताशा सोबत विवाह करणार आहे. पण वरुणने त्यावेळी साफ केलं की त्याचा सध्या लग्नाचा कोणताही विचार नाही आहे.

Image result for varun dhavan natasha zee

लग्नाच्या मुद्दयावर झालेला ब्रेकअप

वरुण धवन लग्नासाठी तयार नसल्याने नताशाने रागात ब्रेकअपचा निर्णय घेतला होता. पण आता पुन्हा एकदा दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. 2018 मध्येच विवाह करण्याच्या अटीवर दोघांमध्ये पॅचअप झालं होतं. वरुणने तर हे मान्य नाही केलं तर नताशा त्याच्या पासून वेगळ होण्याचा निर्णय घेऊ शकते. पण वरुण याच वर्षी काही महिन्यांमध्ये विवाह करणार असल्याची चर्चा आहे.

Image result for varun dhavan natasha zee