या दिवशी अडकणार विकी कौशल आणि कतरिना कैफ लग्नबंधनात, लग्नाची तारीख ठरली ?

विकी कौशल आणि कतरिना कैफ काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे खूप चर्चेत आहेत. 

Updated: Oct 26, 2021, 10:56 PM IST
या दिवशी अडकणार विकी कौशल आणि कतरिना कैफ लग्नबंधनात, लग्नाची तारीख ठरली ?

मुबंई : विकी कौशल आणि कतरिना कैफ काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे खूप चर्चेत आहेत. दोघंही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. इतकंच नाही तर कधी-कधी दोघंही एकमेकांच्या घरी जाताना स्पॉट झाले आहेत. याआधी दोघांचा रोका समारंभ झाल्याच्या बातम्या येत होत्या आणि आता त्यांच्या लग्नाच्या बातम्या येत आहेत. बातम्या येत आहेत की, दोघांनाही आता त्यांचं नातं पुढे न्यायचं आहे आणि लवकरच लग्न करायचं आहे.

एका रिपोर्टनुसार, दोघांनी लग्नाची तयारी सुरू केली आहे. दोघांचे वेडिंग आउटफिट्स डिजाइनर सब्यसाचीने डिझाइन केले आहेत. यापूर्वी सब्यसाचीने दीपिका पदुकोणच्या लग्नाचा ड्रेसही डिझाइन केला होता. या वर्षी नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये दोघंही लग्न करू शकतात.

आता या बातमीत किती तथ्य आहे हे दोन्ही कलाकारच सांगू शकतात. तसं, काही दिवसांपूर्वी जेव्हा विकीला त्याच्या कतरिनासोबतच्या रोका समारंभाच्या बातम्यांबद्दल विचारण्यात आलं होतं तेव्हा तो म्हणाला होता की, ही बातमी आपल्या मित्राने (मीडिया) पसरवली आहे. मी लवकरच एंगेजमेंट करणार आहे. पण योग्यवेळ आल्यावर. 

दोघांच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर कतरिना लवकरच सूर्यवंशी या चित्रपटात दिसणार आहे ज्यात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दुसरीकडे, विकी लवकरच सॅम बहादूर आणि द ग्रेट इंडियन फॅमिली या चित्रपटात दिसणार आहे.