कर्जबुडव्या विजय माल्ल्याच्या आयुष्यावर सिनेमा

कर्जबुडव्या विजय माल्ल्याच्या आयुष्यावर आधारित एक सिनेमा लवकरच प्रेक्षकांना पाहाता येणार आह..निर्माता-दिग्दर्शक पहलाज निहलानी यांनी या सिनेमाची घोषणा केली असून रंगिला राजा असं सिनेमाचं नाव असेल..इतकंच नाही तर अभिनेता गोविंदा विजय मल्ल्यांची भूमिका साकारणार आहे....

Updated: May 30, 2018, 03:35 PM IST
कर्जबुडव्या विजय माल्ल्याच्या आयुष्यावर सिनेमा title=

मुंबई : कर्जबुडव्या विजय माल्ल्याच्या आयुष्यावर आधारित एक सिनेमा लवकरच प्रेक्षकांना पाहाता येणार आह..निर्माता-दिग्दर्शक पहलाज निहलानी यांनी या सिनेमाची घोषणा केली असून रंगिला राजा असं सिनेमाचं नाव असेल..इतकंच नाही तर अभिनेता गोविंदा विजय मल्ल्यांची भूमिका साकारणार आहे....

हा सिनेमा पूर्णपणे मनोरंजनात्मक असून सिनेमात गोविंदाचा एक नवा लूक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे..याआधीही निहलानी आणि गोविंदाने अनेक हिट फिल्म्स प्रेक्षकांना दिल्या आहेत त्यामुळे आता रंगिला राजा सिनेमाची उत्सुकता चाहत्यांना असेल अशी खात्री आहे...सध्या या सिनेमाचं चित्रीकरण सुरु आहे....ऑगस्ट महिना अखेरीपर्यंत हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

गेल्या आठड्यात निहलानी यांनी गोविंदासोबत या सिनेमाचे एक गाणेही शूट केले होते. या गाण्याचा लूक, थीम आणि म्युझिक सगळं काही किंगफिशरच्या कॅलेंडरच्या थीमनुसार होते. निहलानी यांना गोविंदाच्या भूमिकेबाबत विचारण्यात आले असता त्यांनी काही सांगण्यास नकार दिला.