मुंबई : 'उरी' फेम अभिनेता विकी कौशलच्या आयुष्याला ग्रहण लागल्याचे दिसत आहे. वर्षाच्या सुरूवातीला चढत्या क्रमावर असलेल्या या अभिनेत्याच्या खाजगी आयुष्यात काही-तरी बिनसले आहे. विकी अभिनेत्री हरलीन सेठीला डेट करत होता. सध्या त्याच्या ब्रेकअपच्या चर्चा फार रंगत आहेत. 'उरी' सिनेमाचा जोश कायम असताना त्याच्या नात्याबतद्दल त्याने अधिकृत घोषणा केली होती. पण आता त्यांच्या नात्याला उतरती कळा लागली आहे. विकी-हरलीन दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अकाउंटवरुन अनफॉलो केले.
हरलीनने सोशल मीडियावर अनेक ब्रेकअप पोस्ट लाईक केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी हरलीनची 'ब्रोकन' वेब सीरिज प्रदर्शित झाली. या वेब सीरिजसाठी हरलीनला बेस्ट डेब्यू फिमेल पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
नुकताच झालेल्या एका चॉट शोमध्ये विकी कोणाला तरी डेट करत असल्याचे समोर आले होते. पण ही मिस्ट्री गर्ल कोण आहे हे मात्र गुलदस्त्यात आहे. काहीदिवसांपूर्वी विकी-हरलीनने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता आणि फोटोच्या कॅप्शनमध्ये हाउज द जोश असे लिहीले होते. अद्याप दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही.