विक्रम आपलं प्रेम ईशापुढे कसे व्यक्त करेल...

'झी मराठी'वरील सध्याची अधिक लोकप्रिय मालिका एका नव्या टप्प्यावर आली आहे. विक्रम सरंजामे ईशाच्या प्रेमात पार हरवून गेले आहेत. 

Updated: Oct 17, 2018, 05:59 PM IST
विक्रम आपलं प्रेम ईशापुढे कसे व्यक्त करेल...

मुंबई : 'झी मराठी'वरील सध्याची अधिक लोकप्रिय मालिका एका नव्या टप्प्यावर आली आहे. विक्रम सरंजामे ईशाच्या प्रेमात पार हरवून गेले आहेत. त्यामुळे विक्रम आपले प्रेम ईशापुढे कसे व्यक्त करेल, ही गोष्ट मोठी रंगतदार असेल. या मालिकेच्या कालच्या एपिसोडमध्ये असेच काहीसे गंमतदार घडले. आपल्यावर रुसलेल्या ईशाला समजावण्यासाठी विक्रम जातो. रस्त्यावरून चालत जाणाऱ्या ईशाला विक्रम आपल्या गाडीत बसायला सांगतो पण, ती गाडीत बसत नाही आणि तडक रिक्षा पकडते तेव्हा चक्क विक्रमही तिच्यासोबत रिक्षात जाऊन बसतो. 

दरम्यान, ईशाला कळतं की, तिच्या काळजीने विक्रम दिवसभर उपाशीच आहे, मग दोघे जेवणासाठी बाहेर जातात. पहिल्या प्रेमात पडलेल्या दोन व्यक्तींच्यात जसे गोड रुसवे फुगवे निर्माण होतात अगदी तसेच ईशा आणि विक्रमच्यात सध्या होत आहेत. 

फरक एवढाच आहे की या प्रेमात पडलेल्या दो न जीवांच्या वयांमध्ये कमालीचा फरक आहे आणि त्यामुळेच ही मालिका सध्या अधिक लोकप्रिय होत आहे. पुढे, विक्रम आणि ईशा फुटपाथवर जेवण करताना एकमेकांच्या मनातील भावना व्यक्त करता करता काही क्षण सोबत घालवतात. 

जेवणानंतर, विक्रम आणि ईशा पावभाजी खाऊन घरी निघत असतानाच तिथे ईशाचे आणि बाबा येतात आणि विक्रमला अवघडल्यासारखे वाटते. 

मानतून ईशावर अफाट प्रेम करणारा विक्रम जगाची धास्ती झिडकारून ईशापुढे आपले प्रेम व्यक्त कोणत्या प्रकारे करेल हे बघण्यासाठी तुला पाहते रे या मालिकेचा पुढील भाग बघायला विसरू नका.