आलिया भट्टकडून महत्त्वाच्या नियमांचं उल्लंघन, ज्यामुळे अनेकांना धोका?

आलिया भट्टला अनेक चाहते फॉलो करतात, पण ती चुकीचं वागली तर....  

Updated: Dec 16, 2021, 09:10 AM IST
आलिया भट्टकडून महत्त्वाच्या नियमांचं उल्लंघन, ज्यामुळे अनेकांना धोका? title=

मुंबई : अनेक चाहते असे असतात जे कायम त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटींना फॉलो करतात. अशीचं एक अभिनेत्री म्हणजे आलिया भट्ट. फार कमी कालावधीन चाहत्यांच्या मनात घर करनारी अभिनेत्री आलिया भट्टने कोरोना नियामांचा भंग केला आहे. तिच्या एका निर्णयामुळे अनेकांना धोका आहे. आलिया भट्टने होम क्वारंटाईन नियमांचं उल्लंघन केलं आहे. 

आलिया हायरिस्क कोरोना रुग्णाच्या संपर्कात आली होती. त्यामुळे आलियाला क्वारंटाईन राहाण्यास सांगण्यात आलं. 7 दिवसांच्या क्वारंटाईनचं बंधन झुगारुन आलिया दिल्लीत पोहोचली.  5 दिवसांनंतरच आलिया भट दिल्लीत पोहोचल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

होम क्वारंटाईनच्या नियमांचं उल्लंघन करुन एका दिवसाच्या कामाकरता अभिनेत्री आलिया भट दिल्लीला पोहचली.आलिया भट करण जोहरनं आयोजीत केलेल्या पार्टीत सहभागी झाली होती. या पार्टीतील करिना कपूरसह चार अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या. 

या पार्टीत उपस्थित असलेल्या सर्वांची कोरोना टेस्ट करण्यात आली. आलियाची टेस्ट निगेटिव्ह आली होती मात्र महापालिकेच्या आरोग्य विभागानं तिला 7 दिवसांच्या क्वारंटाईनचं बंधन घातलं होतं. मात्र केवळ पाच दिवसांनंतरच आलिया भट दिल्लीत पोहोचली.