वयाच्या 6 व्या वर्षी गमावला एक पाय; पाहा तिच सौंदर्यवती आज आहे सुपरमॉडेल

बोन कॅन्सरमुळे तिला पाय गमवावा लागला होता, पण... 

Updated: Oct 21, 2021, 12:59 PM IST
वयाच्या 6 व्या वर्षी गमावला एक पाय; पाहा तिच सौंदर्यवती आज आहे सुपरमॉडेल title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

न्यूझीलंड : सौंदर्याची व्याख्या ही आता साचेबद्ध चौकटीतून बाहेर पडली आहे. प्रत्येक गोष्ट, व्यक्ती ही तितकीच सुंदर असते हेच आता सिद्ध होत आहे. न्यूझीलंडच्या चेरी लुईस या मॉडेलनं हेच सिद्ध करुन दाखवलं आहे. तिचं नाव गाजण्यास कारण ठरत आहे ते म्हणजे कमालीचा आत्मविश्वास. 

चेरी लुईस ही एक मॉडेल असून, ती स्वत:चे अनेक फोटो पोस्ट करत असते. अनेकांना तर तिचा एक पाय नसण्याची चर्चा वगैरे केवळ प्रसिद्धीसाठीच केलं जात असल्याचंही म्हटलं जातं. 

चेरी अवघ्या 6 वर्षांची असताना तिला हाडांच्या कॅन्सरचं निदान झालं. या आजारपणात तिला एक पाय गमवावा लागला.  अनेक डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिला हाडांचा कॅन्सर असल्याचं सांगण्यात आलं. Osteosarcoma या प्रकारच्या कॅन्सरमध्ये हाडांच्या सेल्समध्ये गाठी तयार होतात. या निदानानंतर तिचा पाय काढावा लागणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. चेरीचा जीव वाचवण्यासाठी असं करणं गरजेचं होतं. पण, यानंतर ती पुरती तुटली होती. तिला नैराश्याचा सामनाही करावा लागला होता. 

29 वर्षांच्या चेरीनं फॅशन जगतात आपली ओळख निर्माण केली. ती सध्या मॉडेल आणि फॅशन स्टायलिस्ट आहे. शारीरिक व्यंग असूनही चेरी सर्वांच्या आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय आहे. तिच्या आत्मविश्वासाची सर्वजण प्रशंसाही करतात. मोठमोठ्या ब्रँडसाठी मॉडेलिंग करणाऱ्या चेरीनं वयाच्या 16 व्या वर्षी फॅशन स्कूलमध्ये जाणं सुरु केलं होतं. पुढे एकएक टप्पा ओलांडत चेरी खऱ्या अर्थानं एक सेलिब्रिटी म्हणून ओळखली गेली.