स्टंट करत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत असताना अचानक अक्षय कुमार सोबत हे काय झालं ?

मिस्टर खिलाडी अक्षय कुमारने आपल्या अनोख्या स्टाईलमध्ये भारतीयांना ७१ व्या  स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिला.

Updated: Aug 16, 2017, 12:54 PM IST
स्टंट करत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत असताना अचानक अक्षय कुमार सोबत हे काय झालं ?  title=

मुंबई : मिस्टर खिलाडी अक्षय कुमारने आपल्या अनोख्या स्टाईलमध्ये भारतीयांना ७१ व्या  स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिला.

सद्ध्या अक्षय 'गोल्ड' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी इंग्लंडमध्ये आहे. 

इंग्लंडमधूनच एका व्हिडियोद्वारा अक्षय भारतीयांसाठी  खास व्हिडीयो शूट करत होता. अक्षय सायकल स्टंट करत शुभेच्छा देत होता.पण हा सायकल स्टंट करताना त्याचा तोल गेला आणि अक्षय एका बाजूला पडला. अक्षयचा हा व्हिडियो इंटरनेटवर झपाट्याने व्हायरल होत आहे.  

 

'ज्या देशापासून आपण स्वातंत्र्य मिळवले त्याच देशाच्या भूमीतून मी तुम्हांला भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत आहे. मला खूपच फ्री वाटतय. भारताप्रमाणेच मला इथेही खूप फ्री वाटतयं.त्यामुळे हॅपी इंडिपेंंडन्स  डे... ' असं अक्षय म्हणत असतानाच त्याचा सायकलवरील तोल सुटला. आणि तो धडपडला असा हा मजेशीर व्हिडियो युट्युबरवर झपाट्याने पसरत आहे.