Monkey Cycling Video: सायकलस्वार माकडं पाहून, तुम्हालाही आठवले का 'जय-वीरू'?

हे असं काहीतरी पाहा... चेहऱ्यावर हमखास हसू येईल... 

Updated: May 14, 2022, 12:36 PM IST
Monkey Cycling Video: सायकलस्वार माकडं पाहून, तुम्हालाही आठवले का 'जय-वीरू'?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई: सोशल मीडियावर दर दिवशी व्हायरल होणाऱ्या असंख्य व्हिडीओंमध्ये सर्वाधिक गाजलेले आणि तितक्याच मोठ्या प्रमाणात शेअर केल्या जाणाऱ्या व्हिडिओंमध्ये प्राण्यांचे व्हिडीओ कमाल गाजतात. मुक्या प्राण्यांनाही कसं बुवा इतकं कळतं, असंच म्हणत अनेकजण व्यक्त होतात. 

काही व्हिडीओंमध्ये प्राण्यांचा निरागसपणा सर्वांनाच भावतो, तर काहींना त्यांचं बुद्धिचातुर्य अवाक् करुन जातं. 

सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर नजरेत आला आहे जो पाहून सर्वात पहिले आठवतायच ते म्हणजे 'शोले' चित्रपटातील 'जय-वीरु'. 

आता तुम्ही म्हणाल प्राण्यांच्या व्हिडीओचा आणि 'शोले' चा काय संबंध? तर, खरा संबंध आहे. कारण, इथं व्हिडीओमध्ये दोन माकडं चक्क सायकलवर बसलेली दसत आहेत. त्यातला एक सायकल चालवत आहे, तर दुसरा त्याच्या मागं....डबल सीट म्हणून बसला आहे. (Viral Video Two monkeys cycling internet remebers sholey movie jay viru )

ही दृश्य पाहताना माकडांची सायकलस्वारी लगेचच जय आणि वीरु यांच्या प्रसिद्ध बुलेटचीच आठवण करुन देत आहेत. ज्यावर बसून, 'ये दोस्ती हम नही तोडेंगे' असं म्हणत ते दोघं त्यांच्या मैत्रीचा दाखला देत फिरत होते. 

तिथं ते आणि इथं ही माकडं.... तसं पाहिलं तर संबंध काहीच नाही... आणि जोडला तर अगदी थेट संबंध. व्हिडीओ पाहून तुम्हीच ठरवा...