'मी स्पिनर्सला कधीच रिस्पेक्ट देत नव्हतो पण...'; घूमर सिनेमावर बोलताना वीरेंद्र सेहवाग भावूक; पाहा Video

Virender Sehwag Video on Ghoomer movie: . क्रिकेटपटूंच्या स्ट्रगलची कल्पना यातून येते. मी स्पिनरला कधी रिस्पेक्ट देत नाही, पण सैयामीने ज्या प्रकारे बॉल फिरवला, तो कौतुकास्पद होता, असं सेहवाग म्हणतो. त्यावेळी...

Updated: Aug 19, 2023, 04:24 PM IST
'मी स्पिनर्सला कधीच रिस्पेक्ट देत नव्हतो पण...'; घूमर सिनेमावर बोलताना वीरेंद्र सेहवाग भावूक; पाहा Video title=
Virender Sehwag, Ghoomer,

Virender Sehwag on Ghoomer : सर्वांना प्रतिक्षा असलेला घुमर (Ghoomer Movie) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन  (Abhishek Bachchan) आणि अभिनेत्री सैयामी खेर (Saiyami Kher) यांनी या चित्रपटात काम केलंय. एका हातानं बॉलिंग करणाऱ्या खेळाडूची कथा दाखवणारा हा सिनेमा इमोशनल करणारा आहे. खेळाडूंच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी आणि संघर्षावर भाष्य करणारा चित्रपट प्रेक्षक पसंती दर्शवत आहेत. अशातच आता टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने व्हिडीओ शेअर करत घुमर चित्रपटाचा रिव्हिव सर्वांसमोर शेअर केला आहे.

काय म्हणाला वीरेंद्र सेहवाग?

मी काल घुमर पिच्चर पाहिला. मला सिनेमा खुप आवडला. क्रिकेटवरील सिनेमा पाहताना नेहमी आनंद होतो. या सिनेमामध्ये क्रिकेट तर आहेच त्याचबरोबर इमोशन देखील आहे. क्रिकेटपटूंच्या स्ट्रगलची कल्पना यातून येते. मी स्पिनरला कधी रिस्पेक्ट देत नाही, पण सैयामीने ज्या प्रकारे बॉल फिरवला, तो कौतुकास्पद होता. हा रोल खुप अवघड होता. पण सैयामीने त्यात इमोशन भरून त्याला वेगळा रंग दिला. मी तसंही कोचचं पण ऐकत नाही. मात्र, अभिषेक बच्चनने अशी ऍक्टिंग केलीये की, तुम्हालाही त्याचं म्हणणं ऐकावं वाटेल. घुमर सिनेमा तुम्ही कुटुंबासोबत नक्कीच बघा. जसं बच्चनजींनी सांगितलं तसं मी पण म्हणतो, आय लव्ह थिस गेम. खूप जास्त अश्रू घेऊन जा, कारण हा सिनेमा तुम्हाला खूप रडवेल, असं वीरेंद्र सेहवाग म्हणाला आहे.

पाहा Video

वीरेंद्र सेहवागचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिषेक बच्चनने देखील वीरेंद्र सेहवागचा हा व्हिडीओ शेअर करत त्याला कॅप्शन दिलंय. वीरू पाजी, तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. तुमचं प्रोत्साहन आमच्यासाठी महत्वाचं होतं, असं अभिषेक बच्चन म्हणतो.  प्रसिद्ध दिग्दर्शक आर. काल्की यांनी देखील सेहवागच्या रिव्हिवचं स्वागत केलंय.

आणखी वाचा - Jasprit Bumrah: तिच स्टाईल अन् तोच जोश, कमबॅकनंतर दुसऱ्याच बॉलवर बुमराहने उडवल्या दांड्या; पाहा Video

दरम्यान, शिवेंद्र सिंह आणि इनवाका दास  या कलाकारांनी देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुली याने देखील सिनेमाच्या ट्रेलरचं कौतूक केलं होतं. माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक... अभिषेक... ट्रेलर छान दिसतोय...संपूर्ण चित्रपटाची वाट पाहत आहे, असं सौरव गांगुली म्हणाला होता. घूमरमध्ये शबाना आझमी आणि अंगद बेदी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.