'Indian Idol 12' मधून ब्रेक घेतल्यानंतर संगीतकार विशाल ददलानी शोमध्ये का परतला नाही?

संगीतकार विशाल ददलानीने 'इंडियन आयडॉल 12'मध्ये जज म्हणून कामगिरी पाहिली होती.

Updated: Oct 20, 2021, 10:02 PM IST
 'Indian Idol 12' मधून ब्रेक घेतल्यानंतर संगीतकार विशाल ददलानी शोमध्ये का परतला नाही?

मुंबई : संगीतकार विशाल ददलानीने 'इंडियन आयडॉल 12'मध्ये जज म्हणून कामगिरी पाहिली होती. त्याने जूनमध्ये ब्रेक घेतल्यानंतर म्युझिक रिअॅलिटी शोमध्ये परत का परतला नाही हे उघड केलं आहे. विशाल ददलानी म्हणाला की, ''निर्मात्यांना मला शोमध्ये आणणं आर्थिकदृष्ट्या शक्य नाही कारण मी मानधनाच्या बाबतीत महागडा आहे.'' आता या शोमध्ये संगीतकार अनु मलिक यांनी जज म्हणून त्याची जागा घेतली आहे.

कोविड -19 साथीमुळे मुंबईत शूटींगवर बंदी घातल्यानंतर विशालने ब्रेक घेतला आणि तो लोणावळा येथे त्याच्या फॅमिलीसोबत राहत होता. 'इंडियन आयडॉल 12'चा सेट मुंबईहून दमणला स्थलांतरित झाल्यावर त्याने शो सोडला. शोचा सेट परत मुंबईला हलवल्यानंतरही तो सेटवर पोहचला नाही. 

या शोने एक खास पॅटर्न तयार केला
एका मुलाखतीत विशाल म्हणाला, 'मी काही महिने दूर होतो त्यामुळे त्यांना माझ्या जागी नवीन जज या शोला आणावे लागले. या शोने एक ठराविक नमुना तयार केला आणि मला शोमध्ये परत आणणं त्यांच्यासाठी आर्थिकदृष्ट्या शक्य नव्हतं. मी एक जज म्हणून महाग आहे. 

विशाल आता 'सा रे गा मा पा' मध्ये दिसणार आहे.
विशाल आता म्युझिक रिअॅलिटी शो 'सा रे गा मा पा' मध्ये जजच्या खुर्चीत दिसणार आहे. तो म्हणाला, 'भलेही मी शोला जज करो किंवा नाही, तुम्ही मला कुठेही ठेवू शकता आणि मला खूश रहाण्याचा मार्ग सापडतो. आपल्या विश्वाचं केंद्र संगीत आहे. मी वैयक्तिक कार्यक्रमांमुळे एखाद्या शोमधून बाहेर पडतो किंवा नवीन शोला जज करतो. मुख्य संगीत किंवा फोकस म्हणजे तरुण संगीतकारांना मदत करणं, प्रोत्साहन देणं आणि व्यासपीठ देणं.