मुंबई : तुझ्यात जीव रंगला 'या' मालिकेत राणादा या ही भूमिका साकारुन घरा-घरात पोहचलेला हार्दिक तुफान लोकप्रिय झाला. आज अभिनेता त्याचा ३५वा वाढदिवस साजरा करत आहे. मराठी सिनेसृष्टीचं लाडक कपल हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरने गेल्यावर्षी ४ डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधली. या दोघांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलं. पुण्यात अतिशय धुमधडाक्यात दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता. या लग्नाच्या फोटो आणि व्हिडिओंना सोशल मीडियावर खूप पसंती मिळाली होती. लग्नानंतर ही गोड जोडी एकमेकांसोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ कायम शेअर करत असतात.
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेनंतर हार्दिकने अनेक मालिकांद्वारे आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना दाखवली. मात्र तरीही लोकं त्याला आजही राणा दा याच नावाने ओळखतात. त्याचा चालतय की हा डायलॉग तर इतका प्रसिद्ध झाला की, लोक रोजच्या बोलण्यातही तो वापरु लागले. मात्र या मालिकेतून प्रसिद्ध होण्यापूर्वी तो काय करायचा माहित आहे का ?
मालिका विश्वात प्रवेश करण्याआधी त्याने अभिनय क्षेत्रातच खूप संघर्ष केला आहे. टीव्हीवर लागणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात किंवा इतर कोणत्याही विशेष कार्यक्रमांमध्ये हार्दिकने अभिनयासोबतच आपल्या डान्सचीही जादू प्रेक्षकांना दाखवली. मात्र याशिवाय स्ट्रगलच्या काळात त्याने बॉलिवूडमध्येही बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केलेले.
अजय देवगणच्या सन ऑफ सरदार या गाण्यात हार्दिकने साइड डान्सर म्हणून डान्स केला आहे. सुप्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी तो डान्स कोरिओग्राफ केला होता. त्यानंतर त्याने अनेक हिंदी मालिका अन् चित्रपटांसाठी ऑडिशन दिल्या. पण पाहिजे तशा भूमिका न मिळाल्यामुळे त्याने आपला मोर्चा मराठी मालिकांकडे वळवला आणि त्याला खरी प्रसिद्धी मिळाली ती म्हणजे तुझ्यात जीव रंगला मालिकेतून. राणा दा आणि पाठक बाई ही जोडी जशी मालिकेत हिट झाली तशीच खऱ्या आयुष्यातही हे कपल एकमेकांचे झाले. नुकतीच हार्दिकच्या चाहत्यांसाठी अजून एक गुडन्यूज समोर येत आहे.
अभिनेता हार्दिक जोशीला यंदा त्याच्या वाढदिवसाची अनोखी भेट मिळाली आहे. हार्दिकची प्रमुख भूमिका असलेल्या "क्लब 52 या चित्रपटाचं टायटल पोस्टर काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं होतं . आज हार्दिकच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन त्याच्या आगामी "क्लब 52" या चित्रपटातील लूक हा सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला आहे.

नाथ प्रॉडक्शन्स प्रस्तुत "क्लब 52 या चित्रपटाची निर्मिती वैशाली ठाकूर यांनी केली आहे. एक डाव नियतीचा अशी टॅगलाईन असलेल्या क्लब 52 या चित्रपटाच्या पोस्टरवर रावडी-रफटफ हार्दिक दिसून येतोय. मोठ्या सोफा खुर्चीवर बसलेला हार्दिक, डोक्यातून वाहणारं रक्त आणि आजुबाजूला उडणारे पत्ते यातून कथानकाविषयीचे सूचक संकेत देण्यात आले आहेत. हार्दिकचा धमाकेदार लूक असलेल्या या पोस्टरमुळे चित्रपटाविषयी नक्कीच उत्सुकता वाढली आहे. प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचं पहिलं पोस्टर लाँच झाल्यानं हार्दिकला वाढदिवसाची अनोखी भेट मिळाली आहे. येत्या १५ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात "क्लब 52" हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
|
NZ
(20 ov) 173/6
|
VS |
UAE
175/0(15.2 ov)
|
| New Zealand beat United Arab Emirates by 10 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
UAE
(20 ov) 173/6
|
VS |
NZ
175/0(15.2 ov)
|
| New Zealand beat United Arab Emirates by 10 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NAM
(20 ov) 156/8
|
VS |
NED
159/3(18 ov)
|
| Netherlands beat Namibia by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.