Nagarjuna Video Viral: नागार्जुनने सूनेसोबत मंदिरात असं काय केलं की नेटकऱ्यांकडून झाला ट्रोल?

Nagarjuna Video Viral: लग्नानंतर मुलगा नागा चैतन्य आणि सून शोभितासोबत नागार्जुन एका मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्या क्षणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. नागार्जुनने सून शोभितासोबतच्या त्या कृत्यामुळे त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल केलंय. तर काही लोकांनी त्याच कौतुक केलंय. 

नेहा चौधरी | Updated: Dec 9, 2024, 03:19 PM IST
Nagarjuna Video Viral: नागार्जुनने सूनेसोबत मंदिरात असं काय केलं की नेटकऱ्यांकडून झाला ट्रोल?

Nagarjuna Video Viral : गेल्या काही दिवसांपासून नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नापूर्वीचे विधी आणि लग्नाचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पारंपारिक पद्धतीने नागा आणि शोभिताचा विवाह सोहळा झाला. शोभिताचा वधू लूक पाहून चाहते त्यांचं कौतुक करत आहे. नागा चैतन्यचं हे दुसरं लग्न आहे. नागा आणि शोभिता यांचा साखरपुडाची घोषणा नागार्जुन यांने सोशल मीडिया केल्यानंतर अनेकांचा भुवया उंचावल्यात. नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला 4 डिसेंबर रोजी हैदराबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये विवाहबद्ध झाले. पण या संपूर्ण सोहळ्यामध्ये नागार्जुन, सून शोभिता यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये नागार्जुन यांची सून शोभितासोबतची एका कृत्याने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. नागार्जुन यांच्या या कृत्यामुळे नेटकऱ्यांनी ट्रोल तर काहींनी त्यांचं कौतुक केलंय. 

Add Zee News as a Preferred Source

नागार्जुनने सूनेसोबत मंदिरात असं काय केलं?

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला हे श्रीशैलम, आंध्र प्रदेशमधील मल्लिकार्जुन मंदिरात त्यांच्या लग्नाच्या एका दिवसानंतर आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते. सुपरस्टार नागार्जुनही या जोडप्यासोबत होता. त्याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओंमध्ये या जोडप्यासोबत नागार्जुनही पूजा करताना दिसत आहेत. या व्हिडीओतील एका क्षणाने लोकांचे लक्ष वेधून घेतलं. 

व्हायरल व्हिडीओमध्ये नागार्जुन अक्किनेनी, नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला पुजाऱ्यासमोर डोके टेकवताना दिसत आहे. पुजारी त्यांना हळद, चंदन आणि फुलांनी बनवलेले ताट देतात, जेणेकरून ते स्वतःला अभिषेक करू शकतील. जेव्हा पुजारी नागार्जुनच्या कपाळावर चंदन लावतात. त्यानंतर शोभिता धुलिपाला ते चंदन लावण्यास सांगतात. त्यावेळी शोभिता चंदन लावत असताना तिचे मोकळे केस खांद्यावरुन पुढे येतात. तेव्हा नागार्जुन शोभिता चंदन लावेपर्यंत केस मागे धरुन ठेवतो. हे पाहून नेटकऱ्यांनी नागार्जुनला ट्रोल केलंय. 

व्हायरल व्हिडीओवर एका चाहत्याने लिहिलंय की, 'तो तिच्या वडिलांसारखा आहे आणि तो तिची काळजी घेतो.' आणखी एका युजरने लिहिलंय, 'मला नागार्जुन खूप आवडतो.' तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, 'हे सुनेचा आदर आणि काळजी देखील दर्शवते.' मात्र, काही लोकांना नागार्जुनचे हे वागणे योग्य वाटले नाही. काहींनी ते अन्यायकारक असल्याचे सांगितलx. सासरा आपल्या सुनेच्या केसांना कसा हात लावू शकतो?

About the Author

Neha Choudhary

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

...Read More