'रेखामध्ये असं काय आहे जे माझ्याकडे नाही?' शबाना आझमी यांनी हॉटेलच्या वॉशरूममध्ये मीरा नायरला असं का विचारलं?

मीरा नायरने रेखाला कामसूत्रमध्ये मुख्य भूमिका दिली. तर शबाना आझमीला मीरा यांच्या एका चित्रपटात छोटीशी भूमिका देण्यात आली होती. त्यामुळे एकदा पंचतारांकित हॉटेलच्या लेडीज रूममध्ये मीरा नायरला त्यांनी थेट विचारलं..., 'रेखामध्ये असं काय आहे जे माझ्याकडे नाही?' 

नेहा चौधरी | Updated: Jun 24, 2024, 03:15 PM IST
'रेखामध्ये असं काय आहे जे माझ्याकडे नाही?' शबाना आझमी यांनी हॉटेलच्या वॉशरूममध्ये मीरा नायरला असं का विचारलं? title=

70-80 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री शबाना आझमी यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे. शबाना तिच्या चित्रपटांसोबतच ती अनेकदा तिच्या वक्तव्यांमुळेही चर्चेत असतात. अशा स्थितीत त्यांनी आता मीरा नायर यांच्यावर नाराजी व्यक्त केलीय. खरं तर या दोघींनी एक एकाच चित्रपटात काम केलंय. मीरा नायर यांच्या 'द रिलक्टंट फंडामेंटलिस्ट' शबाना आझमी यांची छोटीशी भूमिका होती. त्यानंतर या दोघींनी आजपर्यंत एकत्र काम केलं नाही. शबाना आजही मीरासोबत काम करण्यासाठी वाट पाहत आहेत. मग असं काय झालं की, मीरा नायर यांच्यावर शबाना आझमी नाराज आहेत. 

'रेखामध्ये असं काय आहे जे माझ्याकडे नाही?' 

शबाना यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मीरा नायर संबंधित एक रंजक किस्सा शेअर केला. या मुलाखतीत शबाना आझमी यांना विचारण्यात आलं की, त्यांनी पाच दशकांच्या कारकिर्दीत कोणत्या सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांसोबत काम केलंय. या प्रश्नानंतर त्यांनी तो मजेदार किस्सा सांगितला. 

शबाना न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाल्या होत्या. तेव्हा त्यांची भेट मीरा नायर यांच्याशी झाली. जेव्हा शबाना मीरा नायर यांना एका पंचतारांकित हॉटेलच्या वॉशरूममध्ये भेटल्या तेव्हा त्या दोघी चित्रपटाबद्दल बोलत होत्या. मीरा नायर यांनी शबाना आझमी यांना त्यांच्या पाच दशकांच्या दीर्घ कारकिर्दीत ज्यांच्यासोबत काम केलंय अशा संस्मरणीय दिग्दर्शकांची नावं सांग असं म्हटलं. त्यावेळी मी मीराला म्हटलं, 'रेखामध्ये असं काय आहे जे माझ्याकडे नाही?'  तेव्हा नायर म्हणाल्यात 'द रिलक्टंट फंडामेंटलिस्ट'मधली तिची भूमिका खूपच छोटी होती हे मला माहीत आहे, पण भविष्यात नक्कीच तुझ्यासोबत चित्रपट करणार आहे.'

त्यावर शबाना म्हणाल्यात की, 'माझी एका दिग्दर्शकाविरुद्ध तक्रार आहे. ज्यांच्याशी मी अनेक वर्षांपासून बोलत आहे आणि आपण एकत्र काम करायला हवं. त्यानंतरही शेवटी, तिने मला एक छोटीशी भूमिका दिली. जी आमच्या नात्याला न्याय देत नाही. किंवा तिचा माझ्यावर विश्वास नाही. ती व्यक्ती माझ्या शेजारी बसलेली महिला आहे.' हे बोलणं ऐकून मीरा नायर यांना हसू आलं. 

मीरा नायरने रेखासोबत 'कामसूत्र: अ टेल ऑफ लव्ह' या चित्रपटात काम केलंय. हा चित्रपट 1996 मध्ये बनला होता, पण बंदीमुळे तो भारतात प्रदर्शित झाला नाही. जर आपण शबाना आझमीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर शाबाना आझमी शेवटची 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटात झळकल्या होत्या. यामध्ये धर्मेंद्रसोबतच्या त्याच्या किसिंग सीन खूप गाजला होता.