शक्तीमानची गर्लफ्रेंड गीता विश्वास सध्या करतेय 'हे' काम, जाणून व्हाल थक्क...

गीता विश्वास शक्तीमानची चाहती होती. पण ती आज कुठे  आहे ? आणि ती आज काय करतेय हे तुम्हाला माहितीये का?

Updated: Oct 4, 2022, 04:10 PM IST
शक्तीमानची गर्लफ्रेंड गीता विश्वास सध्या करतेय 'हे' काम, जाणून व्हाल थक्क... title=

मुंबई : तुम्हा सर्वांना 'शक्तीमान' ही टीव्ही मालिका आठवत असेलच. मालिकेत गंगाधर ज्या मुलीला देवीजी म्हणून तिच्या मागे-मागे फिरतो ती तुमच्या लक्षात असेलच.  गीता विश्वास शक्तीमानची चाहती होती. पण ती आज कुठे  आहे ? आणि ती आज काय करतेय हे तुम्हाला माहितीये का?

तुम्हाला शक्तीमानची बबली मैत्रीण गीता विश्वास आठवतेय का?
गीता विश्वास म्हणजेच वैष्णवी महंतला शक्तीमानमध्ये चांगलीच पसंती मिळाली होती. वैष्णवीला लोकं गीता या पात्राच्या नावानेही ओळखू लागले होते. 1988 मध्ये 'वीराना' चित्रपटात काम केलेल्या वैष्णवीला शक्तीमानने चांगलीच प्रसिद्धी दिली होती. 1998 ते 2005 पर्यंत कोणतीही मालिका शक्तीमानच्या समोर टिकली नाही. शक्तीमान संपल्यावर वैष्णवीने इतर पर्याय शोधले.

तुम्हाला शक्तीमानची बबली मैत्रीण गीता विश्वास आठवते का?
महंत शक्तीमाननंतर वैष्णवी टीव्हीवर दिसली. 'मिले जब हम तुम' आणि 'सपने सुहाने लडकपन के' यासह तिच्या अनेक मालिका प्रचंड हिट होत्या. असं असूनही तिला विशेष ओळख मिळू न शकल्याने ती दक्षिणेकडे वळली. (What is Shaktimaan girlfriend Gita Vaishnavi Mahant doing now)

वैष्णवी महंत दक्षिण भारतीय चित्रपटांकडे वळली. तिने अनेक टॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं. आज शक्तीमानमधील गीता खूप बदलली आहे. वैष्णवी सध्या 'टशन-ए-इश्क' या टीव्ही मालिकेत दिसत आहे. जरी यात तिची भूमिका फारशी नसली. तरी ती स्पोर्टिंग कास्टमध्ये आहे. गीता विश्वास वैष्णवी महंतही तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत आली होती.