'सर्व काही असताना हे करण्याची गरज काय होती', पतीवर शिल्पा भडकली

शिल्पा शेट्टीचा या प्रकरणात काही सहभाग होता का ? याबाबत ही पोलीस तपास करत आहे.

Updated: Jul 27, 2021, 06:36 PM IST
'सर्व काही असताना हे करण्याची गरज काय होती', पतीवर शिल्पा भडकली

मुंबई : Porn Film Case - पॉर्न फिल्म प्रकरणात अटक झाल्यानंतर राज कुंद्रा आणि त्याची पत्नी शिल्पा शेट्टी यांच्यात वाद रंगला आहे. अश्लील चित्रपटाच्या निर्मितीसंदर्भात जेव्हा मुंबई पोलीस राज कुंद्राच्या घरी तपासासाठी पोहोचली तेव्हा शिल्पा शेट्टी सर्वांसमोर त्यांच्यावर रागावली. जेव्हा आपल्याकडे सर्व काही आहे, मग हे सर्व करण्याची काय गरज होती? असा सवाल तिने पतीला केला. पॉर्न फिल्म प्रकरणात अटक झालेल्या राज कुंद्रावर त्याची पत्नी शिल्पा शेट्टी दु:खी आहे. तिला दररोज बर्‍याच प्रश्नांचा सामना करावा लागत आहे.

शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. जेव्हा मुंबई पोलिसांची टीम आरोपी राज कुंद्राला त्याच्या घरी घेऊन गेली. या पथकाने घराची झडती घेतली आणि शिल्पा शेट्टीचा जबाब ही नोंदवण्यात आला. शिल्पाला पतीला समोर पाहताच अश्रू अनावर झाले. शिल्पाने राज कुंद्राला म्हटले की, "आपल्याकडे सर्व काही आहे, मग हे सर्व करण्याची काय गरज होती? यामुळे कुटुंबाचे नाव खराब झाले आणि मला बरेच प्रोजेक्ट सोडावे लागले."

दरम्यान, राज कुंद्राला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. मुंबई पोलीस गुन्हे शाखेचे म्हणणे आहे की कुंद्रा पोर्न फिल्म निर्मितीमध्ये सक्रियपणे भाग घेत होता. आणि त्यासाठी यूकेमधील नातेवाईकाच्या कंपनीशी संबंधित होता. मुंबई पोलिसांनी म्हटले आहे की, कुंद्राच्या सहभागासंदर्भात त्याच्याकडे पुरावे आहेत.

या प्रकरणाची चौकशी करणारी मुंबई प्रॉपर्टी सेलसुद्धा या प्रकरणात शिल्पा शेट्टीच्या भूमिकेची चौकशी करीत आहे. तर आतापर्यंत शिल्पा शेट्टी याच्या घरी दोनदा चौकशी केली गेली होती. पण अद्यापपर्यंत शिल्पा शेट्टी यांच्याविरूद्ध थेट पुरावा मिळालेला नाही. तिच्या नवऱ्याचा या प्रकरणात सहभाग होता का हे तिला माहित होते की नाही हे देखील अजून स्पष्ट झालेले नाही.

अद्याप संपूर्ण प्रकरणात शिल्पा शेट्टीची कोणतीही सक्रिय भूमिका आढळली नाही. इलेक्ट्रॉनिक पुरावा नाही, कोणताही आर्थिक पुरावा नाही, अद्याप कोणतीही कागदपत्रे नाहीत.

कोणत्याही आरोपी किंवा पीडित मुलीच्या तक्रारीत तिचे नावदेखील समोर आलेले नाही. त्यामुळे शिल्पाने 2020 मध्ये व्हियान कंपन्यांच्या संचालक पदाचा राजीनामा का दिला यावर आता मुंबई पोलिसांचे लक्ष लागले आहे. शिल्पाच्या खात्याची चौकशी देखील मुंबई पोलीस करत आहे.