मुंबई : भारतीय संस्कृतीत कुटुंबाला अतिशय महत्त्वं दिलं जातं. संस्कारांचा पायाच मुळात या कुटुंबातून घातला जातो. याला कोणाचाही दुमत नाही. खुद्द बिग बी अमिताभ बच्चनही वयाच्या या टप्प्यावर असताना आपल्या कुटुंबाप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. जीवनाच्या या टप्प्यावर आपल्य़ाला मुलगा, सून आणि नातीचं सुख मिळतं याबद्दल त्यांनी वेळोवेळी आनंद व्यक्त केला.
सून ऐश्वर्या राय बच्चन हिच्याशीही बिग बींचं खास नातं आहे. प्रसूतीनंतर जेव्हा ऐश्वर्या घरी परतली होती, त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अतिशय कठीण प्रसंगाबाबत वक्तव्य केलं होतं. त्यावेळी ते काहीसे भावूकही दिसले. ऐश्वर्या आराध्याच्या वेळी ज्यावेळी प्रसूतकळांच्या वेदनेनं विव्हळत होती, त्यावेळी तिनं कुटुंबाखातर या वेदनांकडेही दुर्लक्ष केलं होतं.
प्रसूतीच्या वेळी पर्याय उपलब्ध असतानाही सी सेक्शनला नकार देत ऐश्वर्यानं कोणतंही औषध न घेता वेदना सहन करत नैसर्गिक प्रसूतीला प्राधान्य दिलं होतं.
ऐश्वर्याच्या गरोदरपणापासून तिच्या प्रसूतीपर्यंत प्रत्येक वेळी प्रत्येक निर्णयामध्ये तिला कुटुंबाची साध मिळाली होती. तिच्या प्रत्येक निर्णयाला कुटुंबानं पाठिंबा दिला होता. इतकंच नव्हे, कुटुंबवस्तल बच्चन कुटुंबियांनी यावेळी खऱ्या अर्थानं सर्वांपुढे एक आदर्श प्रस्थापित केला होता.