अर्चना पूरन सिंह 'या' अभिनेत्याला किस करण्याआधीच घाबरली

जाणून घ्या हा किस्सा 

Updated: Sep 26, 2019, 03:10 PM IST
अर्चना पूरन सिंह 'या' अभिनेत्याला किस करण्याआधीच घाबरली

मुंबई : अर्चना पूरन सिंह यांचा 26 सप्टेंबर रोजी 57 वा वाढदिवस साजरा करणार आहे. अर्चना यांचा सिनेजगतात 32 वर्षांचा प्रवास आहे. आतापर्यंत अर्चना यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. अर्चना आता 'द कपिल शर्मा शो' या रिऍलिटी शोमध्ये सिंधू यांची भूमिका साकारत आहे. 

अर्चना यांनी आतापर्यंत अनेक छोट्या छोट्या भूमिका साकारल्या आणि त्या लोकप्रिय देखील झाल्या. 'कुछ कुछ होता है' सिनेमांत मिस ब्रिगेंजाची भूमिका साकारली. तर 'मोहब्बते' सिनेमांत पंजाबी स्त्रीची भूमिका साकारली. या सर्व भूमिकांच भरपूर कौतुक झालं. 

अनुपम खेर आणि अर्चना पूरन सिंह अनेकदा पडद्यावर एकत्र दिसले. हे दोघे नुकतेच 'द कपिल शर्मा शो' या कार्यक्रमात एकत्र दिसले. त्यावेळी अर्चनाने किसिंग सीनचा किस्सा सगळ्यांसमोर सांगितला. 'लढाई' या सिनेमाचा हा किस्सा आहे. अर्चना यांना अनुपम खेर यांना त्या सीनमध्ये किस करायचं होतं. तेव्हा अर्चना या प्रचंड घाबरल्या होत्या. कारण या अगोदर त्यांनी मोठ्या पडद्यावर किसिंग सीन केला नव्हता. 

त्यावेळी अनुपम यांनी दिग्दर्शक दीपक शिवदसानी यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर तो किसिंग सीन काढण्यात आला. यानंतर अनुपम यांच्याबद्दल अर्चना भरपूर खूष झाल्या होत्या. पुढे अर्चना यांनी सांगितलं की, अगोदर त्यांनी दिग्दर्शक दीपकला फोन करून हा सीन हटवण्यास सांगितला होता. पण का सीन त्यांनी कसा काढून टाकला हे जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. यानंतर अर्चना यांनी अनुपम यांच्यासोबत अनेक सिनेमांमध्ये काम केलं.