शिकवणीच्या पैशांतून सुशांतनं खरेदी केलेली पहिली बाईक

लहानसहान गोष्टींमध्ये तो कशा प्रकारे आनंद शोधत होता याचीच प्रचिती येते.

Updated: Jul 6, 2020, 05:29 PM IST
शिकवणीच्या पैशांतून सुशांतनं खरेदी केलेली पहिली बाईक
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेता sushant sing rajput सुशांत सिंह राजपूत यानं काही दिवसांपूर्वीच जगाचा निरोप घेतला. आयुष्याच्या एका टप्प्यावर येत सुशांतचं आत्महत्येचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या या निर्णयानं सर्वांनाच धक्का बसला. मुळात सुशांत या निर्णयापर्यंत का पोहोचला हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहेत. याच प्रश्नाची उकल करण्यासाठी म्हणून किंवा मग सुशांतच्या आयुष्याबाबत आमखी काही जाणून घेण्यासाठी म्हणून चाहत्यांनी त्याच्या सोशल मीडिया पोस्ट पुन्हा एकदा पाहण्याचा चंग बांधला आहे. 

अशा या अभिनेत्याच्या काही सोशल मीडिया पोस्ट पाहून खरंच सुशांतचं आयुष्य कशा प्रकारे त्याचा यशाच्या वाटांवर घेऊन आलं होतं, लहानसहान गोष्टींमध्ये तो कशा प्रकारे आनंद शोधत होता याचीच प्रचिती येते. यापैकीच एक पोस्ट सर्वांच्या नजरा वळवत आहे. ती म्हणजे सुशांतच्या पहिल्यावहिल्या बाईकची. 

 २० एप्रिल २०१६ ला सुशांतनं एका पिवळ्या रंगाच्या बाईकवर बसलेला फोटो पोस्ट केला होता. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलेलं, '#collegedays #2006 अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग)चं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणी देऊन त्यातून आलेल्या पैशांतून मी ही पहिलीवहिली बाईक खरेदी केली होती. काही गोष्टी खरंच खूप आनंद देऊन जातात.....'

#collegedays #2006 first bike I bought from the money I earned by giving tuitions to aspiring engineering students . Some things make u feel sooooo good.:))

Posted by Sushant Singh Rajput on Wednesday, April 20, 2016

आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या प्रसंगाविषयीच त्यानं सर्वांना माहिती दिली होती. त्याची ही पोस्ट पाहता सुशांतच्या वाट्याला आलेलं यश आणि भरभरात इकतं सहजासहजी आलं नव्हतं हेच स्पष्ट होत आहे. दरम्यान, शिकवणीच्या पैशांतून पहिली बाईक खरेदी करणाऱ्या सुशांतनं पुढे हिंदी कलाविश्वात पाय रोवले आणि पाहता पाहता, रेंज रोव्हर, मसराटी क्वात्रोपोर्त या आलिशान कार आणि बीएमडब्ल्यू बाईकही त्यानं खरेदी केल्या होत्या.