जेव्हा पाकिस्तानचा क्रिकेटर इमरान खानसोबत होणार होतं रेखा यांचं लग्न...

क्रिकेट आणि बॉलिवूडचं नातं खूप जुनं आहे.

Updated: May 13, 2021, 06:17 PM IST
जेव्हा पाकिस्तानचा क्रिकेटर इमरान खानसोबत होणार होतं रेखा यांचं लग्न... title=

मुंबई : क्रिकेट आणि बॉलिवूडचं नातं खूप जुनं आहे. नीना गुप्ता ते अनुष्का शर्मापर्यंत, क्रिकेट-बॉलिवूडमधील अनेक नाती होती. काही अपयशी ठरली तर काही यशस्वी ठरली. क्रिकेट-बॉलिवूडकरांच्या अफेअर्सच्या बातम्याही कायम समोर येत असतात. खासकरुन पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि बॉलिवूड अभिनेत्रींसोबत असलेलं अफेअरच्या चर्चा कायम पहायला मिळतात. त्यापैकी एक नाव म्हणजे, पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान आणि बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांची कहाणी. इम्रान यांचं नाव जरी अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलेलं असलं. तरी रेखासोबत त्यांचं लग्न होणार होतं असं म्हटलं जातं

रेखा यांच्या आईचा होता होकार
त्या काळातील बर्‍याच वृत्तांत रेखा आणि इम्रान खान यांच्या अफेअरची चर्चा होती. रेखा आणि इम्रान एकमेकांच्या प्रेमात असल्याचंही म्हटलं जातं. इतकंच नव्हे तर, रेखा यांच्या आईनेही या नात्याला होकार दिल्याची बातमी समोर आली होती.. इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये 1985चा एक लेख शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये असा दावा केला गेला आहे की.

या 'पोस्ट' च्या वृत्तानुसार, इम्रान खान संपूर्ण एप्रिल महिना मुंबईतच होते. या दरम्यान रेखा आणि इम्रान यांच्यात बऱ्याच भेटीगाठी झाल्या होत्या. दोघंही अनेकवेळा नाईटक्लबमध्ये दिसले. त्याच अहवालात असंही म्हटले आहे की, रेखा यांच्या आई म्हणाल्या की, रेखासाठी योग्य जोडीदार इमरान खानशिवाय कोणी असूच शकत नाही.

या नात्यासाठी त्या दिल्लीला गेल्या आणि एका ज्योतिषालाही भेटल्या. इमरान त्यांच्या मुलीसाठी योग्य साथीदार आहे की नाही हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. ज्योतिष गुरुजी काय म्हणाले ते अद्याप कोणालाच माहिती नाही, पण रेखा यांच्या आई इम्रान यांच्या कुटुंबीयांत सामील होणं रेखासाठी चांगलंच ठरेल असं मानत होत्या

'मी रेखा यांच्यासोबत घालवलेला वेळ कधीच विसरु शकत नाही'
एका दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान म्हणाले होते की, 'मी रेखा यांच्यासोबत घालवलेला वेळ कधीच विसरु शकत नाही, मात्र मला या नात्यातून बाहेर पडावं लागलं.'' कोणत्याही सिने अभिनेत्रीसोबत लग्न करण्याचा माझा हेतू नाही.'' मात्र, रेखा यांनी या नात्यावर कधीचं स्पष्टता दिली नाही. नंतर रेखा यांचं नाव जीनत अमान आणि शबाना आझमी यांच्याशी ही जोडलं गेलं.