जेव्हा रजनीकांत यांच्या जावयाच्या विवाहबाह्य संबंधांच्या चर्चांना उधाण येतं... 

 धनुष आणि श्रुती हासन ही दक्षिण फिल्म इंडस्ट्रीची दोन मोठी नाव आहेत.

Updated: Aug 24, 2021, 09:43 PM IST
जेव्हा रजनीकांत यांच्या जावयाच्या विवाहबाह्य संबंधांच्या चर्चांना उधाण येतं...  title=

मुंबई : धनुष आणि श्रुती हासन ही दक्षिण फिल्म इंडस्ट्रीची दोन मोठी नाव आहेत. २०११-२०१२ मध्ये त्यांच्या '३' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोघांनी त्यांच्या अफेअरच्या अफवांमुळे संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीला हादरवून टाकलं, ज्याचं दिग्दर्शन 'रंजना' स्टारची पत्नी ऐश्वर्या यांनी केलं होतं. असं म्हटलं जातं की, ऐश्वर्या श्रुतीची बालपणीची मैत्रीण आहे. म्हणूनच ऐश्वर्याने श्रुतीला तिच्या '3' चित्रपटासाठी कास्ट केलं होतं तेही तिच्या पतीसमोर.

पण ऐश्वर्याला कुठे माहित होतं की, या कास्टिंगमुळे त्यांच्या वैवाहिक जीवनावर परिणाम होईल कारण धनुष आणि श्रुती हासन चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अधिकाधिक वेळ एकत्र घालवत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मीडिया रिपोर्टनुसार, त्यावेळी धनुष आपल्या पत्नीसोबत सार्वजनिक कार्यक्रमांना जाणं टाळत असे. 

या अफवेबद्दल विचारलं असता श्रुती एका मुलाखतीत म्हणाली की, लोक तिच्याबद्दल काय बोलतात याची तिला पर्वा नाही कारण धनुष हा चित्रपट उद्योगातील तिचा सर्वात चांगला मित्र आहे. ज्याने मला नेहमीच मदत केली आहे. विशेष म्हणजे त्यांचा '3' हा चित्रपट रिलीज झाल्यावर लगेचच त्यांच्या नात्याबद्दल चर्चा तीव्र झाली. मात्र, त्यावेळी धनुषची पत्नी ऐश्वर्यानेही एका मुलाखतीत सांगितलं होतं की, या अफवांमध्ये कोणतंही तथ्य नाही.

त्याचबरोबर, लवकरच धनुष आनंद एल राय यांच्या पुढील चित्रपट 'अतरंगी रे'मध्ये दिसणार आहे, ज्यात अक्षय कुमार आणि सारा अली खान देखील मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचं संगीत ए.आर.रहमान यांनी दिलं आहे. याशिवाय श्रुती हासन सध्या सुपरस्टार प्रभासच्या 'सालार' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात जगपती बाबू देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.