समांथा नागा चैतन्यची पहिली पत्नी नव्हे, Ex-Wife ने स्वत:च केला होता खुलासा, जाहीर केलं पहिल्या पत्नीचं नाव

Naga Chaitanya and Sobhita Dhulipala Engagement: दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्यने (Naga Chaitanya) अभिनेत्री शोभिता धुलिपालासह (Sobhita Dhulipala) साखरपुडा केला आहे. नागार्जुन (Nagarjuna) यांनी सोशल मीडियावर मुलाच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत.   

शिवराज यादव | Updated: Aug 8, 2024, 06:51 PM IST
समांथा नागा चैतन्यची पहिली पत्नी नव्हे, Ex-Wife ने स्वत:च केला होता खुलासा, जाहीर केलं पहिल्या पत्नीचं नाव title=

Naga Chaitanya and Sobhita Dhulipala Engagement: दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्यने (Naga Chaitanya) अभिनेत्री शोभिता धुलिपालासह (Sobhita Dhulipala) साखरपुडा केला आहे. नागार्जुन (Nagarjuna) यांनी सोशल मीडियावर मुलाच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. दोघांनी अत्यंत साध्या पद्धतीने मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत साखरपुडा केला आहे. नागार्जुन यांनी फोटो शेअर करताने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की "आम्हाला सांगताना आनंद होतोय की आमचा मुलगा नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला या दोघांचा आज सकाळी 9:42 वाजता साखरपुडा झाला आहे".

समांथाला घटस्फोट दिल्यानंतर नागा चैतन्यचं नाव अनेकदा शोभितासह जोडण्यात आलं होतं. अनेकदा दोघे एकत्रही दिसले होते. पण दोघांनी अधिकृतपणे आपल्या नात्यावर भाष्य करणं टाळलं होतं. नागार्जुने यांनी शेअर केलेल्या साखरपुड्याच्या फोटोंमधे दोघे पारंपारिक वेषात दिसत आहेत. "शोभिता आमच्या कुटुंबात येणार असल्याने आम्हाला खूप आनंद होत आहे. या नव्या जोडप्याला खूप खूप शुभेच्छा. त्या दोघांना आयुष्यभरासाठी खूप प्रेम आणि आनंद. देवाचा आशीर्वाद नेहमीच त्यांच्यासोबत राहो. 8.8.8 प्रेमाची एक सुंदर सुरुवात...", असंही त्यांनी फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. 

नागा चैतन्यने याआधी समांथा रुथ प्रभूशी 2017 मध्ये लग्न केलं होतं. मात्र चार वर्षांनी 2021 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. दोघांनी 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या Ye Maaya Chesave या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. हा चित्रपट त्यांचा डेब्यू चित्रपट होता. नागा चैतन्यशी लग्न झाल्यानंतर एका मुलाखतीत समांथाने आपण त्याची पहिली पत्नी नसल्याचं म्हटलं होतं. नागा चैतन्यच्या साखरपुड्यानंतर समांथा चर्चेत असून, हे जुनं विधानही पुन्हा चर्चेत आहे. 

लग्नानंतर समांथाने नागा चैतन्य पती म्हणून अगदी योग्य असल्याची पावती दिली होती. Lakshmi Manchu चा चॅट शो Feet Up with The Stars मध्ये समांथाने नागा चैतन्य आपल्याशी लग्न होण्याआधीपासून विवाहित होता असं म्हटलं होतं. तिने उपहासात्मकपणे हे विधान केलं होतं. 

समांथाने आपल्या वैवाहिक आयुष्यावर मस्करीत बोलताना म्हटलं होतं की, नागाचं माझ्याआधी त्याच्या उशीसह लग्न झालं आहे. "उशी त्याची पहिली पत्नी आहे. त्याची उशी नेहमी आमच्या मधे येत असते. इतकंच नाही तर मी त्याला किस करायचा प्रयत्न करते तेव्हाही उशीच मधे येते," असं ती म्हणाली होती.

त्यावेळी नागा चैतन्य आणि समांथाच्या चाहत्यांनी  लग्नानंतर काही वर्षातच दोघांचा घटस्फोट होईल असा विचारही केला नव्हता. दरम्यान आता नागा चैतन्यने साखरपुडा करत दुसऱ्यांदा नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.