मुंबई : शाहरुख खान आणि सलमान खानची मैत्री नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये हे दोघंही एकमेकांच्या चित्रपटाचं कौतुक करताना दिसले. शाहरुखनं तर सलमान खानच्या ट्यूबलाईट या चित्रपटामध्ये एक छोटा रोलही केला होता. पण कतरिना कैफच्या वाढदिवसाला या दोघांमध्ये झालेलं भांडण चर्चेत आलं होतं. या भांडणानंतर मात्र हे दोघं पुन्हा एकदा एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.
एका पत्रकार परिषदेमध्ये सलमानचं नाव ऐकल्यावर शाहरुख मात्र चांगलाच भडकला. शाहरुखला प्रश्न विचारताना एका पत्रकार महिलेनं त्याचा उल्लेख सलमान खान असा केला. एकदा नाही तर अनेक वेळा या पत्रकार महिला शाहरुख खानला सलमान म्हणल्या. यामुळे शाहरुख रागानं लाल झाला. पण रागावर नियंत्रण मिळवून त्यानं या पत्रकाराला तिरकस पद्धतीनं प्रतिक्रिया दिली.