नवी दिल्ली : गेल्या वर्षभरापासून सलमान खान आणि शाहरूख खान यांच्यातील मैत्री चांगलीच चर्चेत आहे. दोघेही ऎकमेकांच्या सिनेमांची जोरदार प्रशंसा करताना दिसतात. इतकेच काय तर सलमानच्या ‘ट्यूबलाईट’मध्येही शाहरूखने कॅमिओ केला होता.
मात्र, शाहरूखसोबत नुकतीच एका पत्रकार परिषदेत असे काही घडले की, शाहरूख रागाने लाल-पिवळा झाला.
शाहरूख एका पत्रकार परिषदेत पत्रकारांसोबत बोलत होता. पत्रकार परिषद सुरू असताना एका पत्रकाराला शाहरूखला प्रश्न विचारायचा होता. पण तो वारंवार शाहरूखला सलमानच्या नावाने हाक मारत होता. या गोष्टीने शाहरूख चांगलाच संतापला. जेव्हा शाहरूखला सलमानच्या नावाने हाक मारली जात होती, तेव्हा शाहरूखच्या चेह-यावरील हावभाव स्पष्ट दिसत आहेत. पण त्याने राग बाहेर न येऊ देता ही गोष्टी गमतीने घेतली.
जेव्हा शाहरूखला सलमानच्या नावाने हाक मारण्यात आली. तेव्हा शाहरूखने इकडे तिकडे पाहिले आणि हे कोण विचारत आहे? नाव काय आहे तुझं? इतक्यात त्या महिला पत्रकारने आपलं नाव सांगितलं. आणि माफीही मागितली.