सनी देओलने केला होता हेमा मालिनी यांच्यावर चाकूने हल्ला? जाणून घ्या सत्यता

सनी देओलने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Updated: Sep 26, 2021, 07:44 PM IST
सनी देओलने केला होता हेमा मालिनी यांच्यावर चाकूने हल्ला? जाणून घ्या सत्यता

मुंबई : सनी देओलने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सनी देओल बॉलिवूडचे सगळ्यात यशस्वी अभिनेते धर्मेंद्र यांचा मुलगा आहे. असं म्हटलं जातं की जेव्हा धर्मेंद्र यांनी दुसरं लग्न केलं होतं, तेव्हा सनीने त्याची सावत्र आई हेमा मालिनीवर चाकूने हल्ला केला होता.

मीडिया रिपोर्टनुसार, लोकांना धर्मेंद्र आणि हेमा मालिनीची जोडी इतकी आवडायला लागली की लोकांनी आधीच चर्चा करायला सुरुवात केली होती की दोघंही एकमेकांसाठी बनवले गेले आहेत. दोघांची जोडी खऱ्या आयुष्यातही खूप लोकांना खूप आवडली. लोकांनी या जोडीला भरभरून प्रेम दिलं.

दोघांची हिट जोडी एकमेकांच्या जवळ येऊ लागली आणि अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसल्यानंतर धर्मेंद्र यांनी खरोखर हेमा मालिनी यांच्याशी लग्न केलं. धर्मेंद्र यांच्या अचानक लग्नाने त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर तुटल्या होत्या. यानंतर सनी देओल आणि बॉबी देओल सुद्धा खूप चिडले.

एका मुलाखतीदरम्यान धर्मेंद्रची यांची पहिली पत्नी प्रकाश कौरने सांगितले की, कुठच्याही मुलाने त्याच्या वडिलांनी फक्त तिच्या आईवर प्रेम केलं पाहिजे. प्रकाश कौरने सांगितलं की, सनीने हेमा मालिनी यांच्यावर चाकूने हल्ला केला नाही. हे पूर्णपणे असत्य आहे.सनीची आई पुढे म्हणाली, "मी जास्त शिक्षित नाही, पण माझ्या मुलांच्या दृष्टीने मी सर्वात सुंदर स्त्री आहे. तिने आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले आहेत. तिने कोणाचंही नुकसान केलं नाही. मात्र आता सनी देओल आणि बॉबी देओल सावत्र आईवरही जिवापाड प्रेम करतात. अनेकदा हेमा मालिनी सोबतचे फोटो सनी आणि बॉबी आपल्या सोशल मीडियावर शेअर करत असतात.