PHOTOS: थलापती विजयची ट्विन सिस्टर पाहिली का? भल्या-भल्या अभिनेत्रींना देते मात

लिओ चित्रपटाने पहिल्या दिवशी जगभरात 145 कोटींची कमाई केली होती आणि अजूनही चित्रपटाची कमाई सातत्याने सुरू आहे. थलपथी विजयचा हा चित्रपट ४०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.

Updated: Oct 24, 2023, 11:59 AM IST
PHOTOS: थलापती विजयची ट्विन सिस्टर पाहिली का? भल्या-भल्या अभिनेत्रींना देते मात title=

मुंबई : जर तुम्ही थलपथी विजयचे चाहते असाल तर आतापर्यंत तुम्ही त्याचा नुकताच रिलीज झालेला 'लिओ' पाहिला असेल. लोकेश कनगराजचा हा चित्रपट मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घालत असून या सिनेमा कमाईचे नवे विक्रमही रचत आहे. चित्रपटातील थलपथी विजयची व्यक्तिरेखा लोकांना विशेष आवडली आहे. त्याचबरोबर लिओची बहीण 'एलिसा दास' देखील या चित्रपटात काही मिनिटांच्या भूमिकेत दिसली आहे. स्क्रीन टाईमच्या काही मिनिटांतच 'अलिसा दास' या पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. 'अलिसा दास'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे का?  

लोकेश कनगराज १९ ऑक्टोबरला 'लिओ' चित्रपट घेऊन आला आहे. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी जगभरात 145 कोटींची कमाई केली होती आणि अजूनही चित्रपटाची कमाई सातत्याने सुरू आहे. थलपथी विजयचा हा चित्रपट ४०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.

या चित्रपटात 'एलिसा दास'ची एन्ट्री एक नवीन वळण घेऊन आली आहे. ही व्यक्तिरेखा या चित्रपटात मॅडोना सेबॅस्टियनने साकारली आहे. चित्रपटातील तिची भूमिका फार मोठी नसली तरी तिने तिच्या छोट्याशा व्यक्तिरेखेद्वारे प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यश मिळवलं आहे. मॅडोना सेबॅस्टियन मुळात तमिळ आणि मल्याळम सिनेमांमध्ये काम करते. तिचा जन्म 1 ऑक्टोबर 1992 रोजी केरळमध्ये झाला. वाणिज्य शाखेत पदवी घेतल्यानंतर, मॅडोनाने गायिका आणि होस्ट म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अभिनयाच्या दुनियेतत येण्याचा मॅडोनाचा कोणताही विचार नव्हता. एकदा 'प्रेम' चित्रपटाच्या दिग्दर्शकाने तिला ऑडिशनसाठी बोलावून 'सेलिन'च्या भूमिकेसाठी फायनल केलं. तिथूनच तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली आणि तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. मॅडोनाला आता गायनासोबतच अभिनयाच्या जगातही पसंती मिळाली आहे. सध्या तिच्या 'लिओ' चित्रपटातील तिच्या व्यक्तिरेखेचं ​​कौतुक होत आहे. चित्रपटांसोबतच ती वेब सीरिजही करत आहे.