Pathaan च्या यशाचे श्रेय कोणाला? सलमान की दीपिका? Shah Rukh Khan म्हणतो...

Pathan Movie Booking Collection : किंग खानने आस्क एसआरकेच्या (#AskSRK) नावाचा एक ट्रेंड ट्विटरवर सुरू केलाय. त्याच्या माध्यमातून शाहरूखच्या चाहत्यांना प्रश्न विचारता येणार आहेत. 

Updated: Jan 28, 2023, 07:36 PM IST
Pathaan च्या यशाचे श्रेय कोणाला? सलमान की दीपिका? Shah Rukh Khan म्हणतो... title=
Shah Rukh Khan, Pathan,Salman,deepika

Shah Rukh Khan, Pathan: बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानच्या (King Khan) पठाण चित्रपटाने (Pathan Movie) पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली. या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड (Pathan Break Record) मोडले आहेत. आता पठाणच्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचे अंदाजे (Pathan Movie Booking Collection) आकडे समोर आले आहेत. सध्या अनेक थेटर्स हाऊसफुल असल्याने पठाणचे अॅडवान्स बुकिंग (pathan advance booking) केलं जातंय. अशातच आता शाहरूख खाने (Shah Rukh Khan) मोठं वक्तव्य केलंय. (Who will get the credit for Pathaan success Salman Khan or deepika padukone Shah Rukh Khan says latest marathi news)

किंग खानने आस्क एसआरकेच्या (#AskSRK) नावाचा एक ट्रेंड ट्विटरवर सुरू केलाय. त्याच्या माध्यमातून शाहरूखच्या चाहत्यांना प्रश्न विचारता येणार आहेत. त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न शाहरूख करतोय. त्याचा हा ट्रेंड जोरदार चर्चेत असल्याचं पहायला मिळतंय. चाहत्यांच्या प्रश्नांची शाहरूखने मजेशीर पद्धतीने उत्तरं दिली. त्यावेळी एका प्रश्नाचं उत्तर दिल्याने शाहरूख (Shah Rukh Khan) पुन्हा चर्चेत आलाय.

आणखी वाचा - 'मला तुझी दुसरी पत्नी बनव...', Urfi Javed ची शाहरुख खानकडे मागणी

काय म्हणाला Shah Rukh Khan ?

सिनेमाचं (Pathan Movie) यश नेमकं कुणाचं?, असा सवाल शाहरूखला करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना शाहरूख म्हणतो... प्रेम (Love) हे जात, धर्म, भाषा, प्रदेश या सर्वांपेक्षा वरचढ आहे हे मांडण्याचा प्रयत्न सिनेमाच्या माध्यमातून करण्यात आलाय. या सिनेमाचं यश हे दुसकं तिसरं कोणाचं नसून तुमचं आहे. तुम्ही सर्व भारतीयांना एकत्र आणण्याचं काम करत आहात, असं शाहरूख म्हणाला. तर, जय हिंद म्हणत त्याने भारतीयांना सॅल्युट देखील केलाय.

पाहा Tweet -  

दरम्यान, शाहरुख तू एवढा सेक्सी (Sexy) का आहेस?, असा प्रश्न शाहरूखला (Shah Rukh Khan) विचारण्यात आला. त्यावर बोलताना शाहरूखने मजेशीर उत्तर दिलंय. हा..हा.. काय करणार, आता सवय झाली आहे, प्रामाणिकता फक्त पाहणाऱ्यांच्या नजरेत असतो, असं शाहरूख ट्विटवर म्हणाला आहेत. त्याचे ट्वीट (Shah Rukh Khan Tweet) सध्या जोरदार चर्चेत असल्याचं पहायला मिळतंय.