Raj Thackerya on Marathi Cinema: गेल्या काही वर्षात राज्यातील राजकारणाची पातळी घसरल्याचं पहायला मिळतंय. राजकीय वर्तुळात टीका प्रत्युत्तर या गोष्टींची रिघ लागल्याचं दिसून येतं. अशातच लोकमतच्या एका मुलाखतीत राज ठाकरे यांनी दिलखुलास उत्तरं दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस (Amrit Fadnavis) आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी राज ठाकरे यांची मुलाखत (Raj Thackeray Interview) घेतली. राज ठाकरे यांच्या नावातच 'राज' आहे, असं म्हणत अमृता फडणवीस यांनी मनसे अध्यक्षांची ओळख करून दिली.
अमृता फडणवीस आणि अमोल कोल्हे यांनी राज ठाकरे यांच्यावर प्रश्नांचा मारा केला. यादरम्यान या महामुलाखती दरम्यान डॉ. खा. अमोल कोल्हे यांनी राज ठाकरे यांना प्रश्न विचारला की, तुम्ही कलकथानक आंदोलन केलंत. त्यानंतर त्यानंतर मराठी सिनेमांना मल्टीप्लेक्समध्ये स्क्रिन मिळायला सुरुवात झाली. आजही बिग बजेट सिनेमांना फक्त स्क्रिन्स मिळतात. स्मॉल बजेट सिनेमांना अजूनही स्क्रिनसाठी दारोदारी फिरावं लागतं ही वस्तुस्थिती आहे. पण त्याही पलिकडे जाऊन. कोविडच्या काळामध्ये ओटीटीचं हे प्लॅटफॉर्म प्रमाण मोठ्या प्रमाणात वाटलं. कदाचित यामध्ये रितेशजींचा अनुभव वेगळा असेल. पण आजही नेटफ्लिक्स डिजने हॉटस्टार यासारखे ओटीटी मराठी सिनेमांना सरसकाट नकार देतात. गेली दोन तिन वर्ष मराठी सिनेमाचं बाईंग हे हॉटस्टार नेटफ्लिक्सने पुर्णपणे थांबवलं.
अशावेळी आपली भूमिका काय होती? यावरं उत्तर देत राज ठाकरे म्हणाले, 'माझं आजही तेच मत आहे. मागच्यावेळेला तुम्हाला सांगितलं की, अनेक प्रोड्यूसर डिरेक्टर यांची ज्यावेळेस मी स्क्रिन मिळवून दिली त्याच्यानंतर मी त्यांची बैठक बोलावली होती. आणि त्यांच्या बैठकित मी त्यांना सांगितलं होतं की, मी तुम्हाला स्क्रिन मिळवून देऊ शकतो पण मी तुम्हाला प्रेक्षक मिळवून नाही देऊ शकत. आणि अनेकदा लोक मला सांगायला येतात की, आमचा सिनेमा चित्रपटगृहातून काढला गेला.
मात्र 'वेड' सारखा सिनेमा काढला का? की रितेशने जाऊन तिथे दमदाटी केली का? नाही ना? यावर अमोल कोल्हे पुढे राज ठाकरे यांना विचारतात, रितेश देशमुखला देखील ही गोष्ट प्रकर्शाने जाणवली असेल जेव्हा योगी आदित्यनाथ जेव्हा महाराष्ट्रात आले आणि त्यांनी फिल्मसिटी युपीला नेण्याचा मनोदय दाखवला तेव्हा अनेकजण पुढे आले पण आज महाराष्ट्रातली ही परिस्थिती आहे की, महाराष्ट्रातला एकून १४ जिल्ह्यांमध्ये आणि ११४ तालूक्यांमध्ये थिएटर स्क्रिनच नाही. म्हणजे चित्रपट उद्योगाआधी चित्रपटविश्वाची ज्याला जननी म्हणतो त्या महाराष्ट्रामध्ये ही दुर्देवी परिस्थिती आहे.
असं असताना बऱ्यापैकी ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही गोष्ट अवलंबून राहिली आहे. पण ते मराठीत सिनेमे घेत नाहीत. या विषयी भूमिका काय? यावरं राज ठाकरे म्हणाले, 'थिएटरमध्ये जर मराठी सिनेमा लागला. आणि तो थिएटर मालक विनाकारण काढून टाकतोय तर मला प्लिज दाखवा. दोन चित्रपट चार प्रेक्षक असं जर समजा जर थिएटर हलवायला लागत असेल कोणताही व्यावसायिक त्याच्याकडे चालत असलेली फिल्म काढणार नाही. मला वाटतं आपला कॉन्टेन्ट सगळ्यात महत्वाचा आहे. तो तुम्ही देणंही तितकंच महत्वाचं आहे. तुम्हाला साऊथ सिनेमा फक्त ४-५ चाललेले माहिती आहे. पण ज्या पडलेल्या फिल्म्स आहेत. त्या आपण बघत नाही आहोत. पण जर मराठी सिनेमा जर दर शुक्रवारी १०-१५ एकदम काढणार असतील तर कोणत्या थिएटरला लागतील. आणि जेव्हा मोठ्या बजेटची फिल्म येते ना त्यावेळेला ती सगळंच घेवून येते. त्यावेळेला तुम्ही काही नाही करु शकत. ती मी सुद्धा नाही थांबवू शकतं. तुम्ही म्हणाल त्याच्या समोर आमचा सिनेमा लागला नाही तर थिएटरवाला काय करेल.'