Mary Kom सिनेमासाठी प्रियांका चोप्रासोबत काय घडलं? 8 वर्षांनंतर त्या वादावर सोडलं मौन

 ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्रा सध्या भारतापासून दूर आहे. 

Updated: Jan 15, 2022, 03:16 PM IST
  Mary Kom सिनेमासाठी प्रियांका चोप्रासोबत काय घडलं? 8 वर्षांनंतर त्या वादावर सोडलं मौन title=

मुंबई : बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाने लोकांना वेड लावणारी ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्रा सध्या भारतापासून दूर आहे. तिने बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक चित्रपट दिले आहेत. प्रियांका चोप्राच्या 'मेरी कॉम' या चित्रपटात तिने बॉक्सिंगची जादू दाखवली आहे.

हा चित्रपट तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाच्या यशानंतरही या चित्रपटात प्रियांकाची जागा नॉर्थ-ईस्ट फीमेलला द्यायला हवी होती, असे प्रश्न उपस्थित केले जात होते. या चित्रपटाच्या रिलीजला 8 वर्षांनंतर प्रियांकाने या प्रकरणावर मौन तोडलं असून तिने या विषयावर आपलं मत मांडलं आहे.

प्रियंकाच्या जवळ आहे 'मैरी कॉम'
'मेरी कॉम'मधील तिच्या भूमिकेबद्दल प्रियंका चोप्राने कबूल केलं आहे की, या भूमिकेसाठी  नॉर्थ-ईस्ट फीमेल शोधायला हवी होती. 'देसी गर्ल'ने नुकतेच व्हॅनिटी फेअरमध्ये बोलताना ही कबुली दिली. ती म्हणाली, 'प्रियांका चोप्राने बॉक्सर मेरी कॉमचा उल्लेख करत सांगितलं की, तिच्या बद्दल तिच्या मनात अजूनही विशेष स्थान आहे. ती आजही तिच्याशी जोडलेली आहे.

8 वर्षानंतर केला खुलासा
या संभाषणात प्रियांका चोप्रा म्हणाली, 'जेव्हा मी मेरी कॉमची भूमिका साकारत होते, तेव्हा सुरुवातीला ती भूमिका घेण्यास मला संकोच वाटत होता कारण मेरी एक जिवंत प्रतीक आहे आणि तिने अनेक महिला खेळाडूंना प्रेरणा दिली आहे. यासोबतच मी कुठेही तिच्यासारखी दिसत नाही. ती नॉर्थ-ईस्ट इंडियामधून आहे. आणि मी नॉर्थ इंडियातून आहे. आम्ही शारीरिकदृष्ट्या एकसारखे दिसत नाही. त्यामुळे नॉर्थ-ईस्ट इंडिया भागातील एका महिलेने हे पात्र साकारलं पाहिजे.