close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सैफ आणि सलमान एकत्र का झळकले नाहीत?

सैफ अली खान सध्या त्याच्या 'लाल कप्तान' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 

Updated: Oct 11, 2019, 04:59 PM IST
सैफ आणि सलमान एकत्र का झळकले नाहीत?

मुंबई : अभिनेता सैफ अली खान सध्या त्याच्या 'लाल कप्तान' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तो नागा साधूच्या भूमिकेत झळकणार आहे. त्याची भूमिका इतर व्यक्तिरेखांपेक्षा वेगळी आहे. सध्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो वेगवेगळ्या वृत्तवाहिनी आणि वेबसाइटला मुलाखती देत आहे. मुलाखतीत त्याला चित्रपट, कुटुंब, बॉलिवूड संदर्भात अनेक प्रश्न विचारण्यात आले. 

बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत त्याने चित्रपट आणि बॉलिवूड अभिनेत्यांबद्दल संवाद साधला. या मुलाखतीत सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे त्याने उत्तर दिले. एका चाहत्याने त्याला अभिनेता सलमान खान सोबत असलेल्या संबंधांविषयी प्रश्न विचारला. 'हम साथ साथ है' चित्रपटात हे दोघे एकत्र झळकले होते. 

सैफने सलमानसोबत 'रेस ३' मध्ये का नाही केले काम? 
या प्रश्नाचे उत्तर देताना सैफ म्हणाला, 'माला वाटतं आम्ही दोघांनी एकत्र काम केलं आहे. माला सलमानसोबत काम करण्यास काही हरकत नाही. आम्ही 'रेस ३' मध्ये एकत्र काम करणार होतो. पण काही कारणांमुळे ते शक्य झाले नाही.' 'रेस २'मध्ये सैफ मुख्य भूमिकेत झळकला होता. 

सैफ 'लाल कप्तान' चित्रपटाच्या माध्यमातून लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. नवदीप सिंग दिग्दर्शित हा चित्रपट १८ ऑक्टोवर रोजी प्रदर्शित होणार आहे. 'लाल कप्नान' शिवाय तो 'तानाजी', 'जवानी जानेमन', 'भूत पुलिस' आदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारणार आहे.