Priyanka Chopra With UNICEF India: बॉलीवूडची स्टार अभिनेत्री आणि हॉलिवूडमध्ये सध्या नाव कमावणारी प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या भारतात जास्त दिसत नाही. लग्नानंतर ती अमेरिकेत राहू लागली. मात्र, ती माहेरी म्हणजेच भारतात फेरफटका मारते. प्रियंका युनिसेफ इंडियाची (unicef india) ब्राँड अॅम्बेसिडर देखील आहे. त्यामुळे अनेकदा ती वेगवेळ्या पोस्ट करताना दिसते. अशातच तीन वर्षानंतर भारतात आलेल्या प्रियांका चोप्राने थेट उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) गाठलं आणि तिथला एक व्हिडीओ शेअर केला आहे.
प्रियांका सध्या उत्तर प्रदेशमधील वेगवेगळ्या गावांना भेट देताना दिसत आहे. उत्तर प्रदेशमधील मुलाचं आरोग्य, शिक्षण आणि मुलींच्या सुरक्षेबाबत प्रश्नांचा हवाला प्रियांकाने घेतला. त्यावेळी तिने एक व्हिडीओ शेअर केला. तिच्या इन्टाग्राम अकाऊंटवरून (Priyanka Chopra Instagram) हा व्हिडीओ शेअर केलाय. त्या व्हिडीओमध्ये प्रियांका एका पोलीस कंट्रोल रूमला भेट देताना दिसते.
आणखी वाचा - सलमान खान आणि ऐश्वर्या राय आमने-सामने; पुन्हा एकदा रंगणार दोघांमध्ये...
त्यावेळी प्रियांका म्हणते...मला एक गोष्ट सांगा, मी देखील लखनऊमध्ये राहिली आहे. इथं एक प्रकारची भीती वाटते, खास करून संध्याकाळी सात वाजल्यानंतर..., असं म्हणताच महिला पोलिस अधिकाऱ्याने तिला थांबवलं आणि डाटा दाखवला. पोलीस अधिकारी प्रियांकाला मध्येच थांबवतात आणि म्हणतात, 'मी तुम्हाला डेटा दाखवते' आणि त्या तिला कंट्रोल रूममध्ये घेऊन जातात.
दरम्यान, हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर तिने खुप छान कॅप्शन (Priyanka Chopra uttar pradesh) देखील लिहिलं आहे. 'महिलांच्या सुरक्षेसाठी अजून बरेच काही करण्याची गरज आहे, परंतु असे उपक्रम ही एक चांगली सुरुवात आहे आणि जर ती प्रभावीपणे आमलात आणली गेली, तर भ्रष्टाचार आणि हिंसाचाराला नक्की आळा घालता येईल', असं प्रियांका यावेळी म्हणाली.
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.